Shyamachi Aai By Sane Guruji (‘श्यामची आई’)
Shyamachi Aai By Sane Guruji (‘श्यामची आई’)
Couldn't load pickup availability
मातेचा महिमा हे साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकातील मध्यसूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत व बालबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे. श्यामच्या आईच्या आठवणी देताना श्यामच्या गोष्टी यावयाच्याच. पुष्कळांना असे वाटत असेल की, या श्यामच्याच गोष्टी आहेत; परंतु या गोष्टींतून शेवटी मातेचे प्रेमच बाहेर पडलेले दिसेल. श्यामला स्वतःचा मोठेपणा किंवा प्रौढी सांगावयाची नसून आईची प्रेममय शिकवणच प्रकट करावयाची आहे. आईला पूर्णपणे प्रकट करण्यासाठी म्हणूनच स्वत:ला त्याने प्रकट केले आहे. त्याने प्रकट होणे, म्हणजे त्याच्या मातेचेच प्रकट होणे होय. मातेबद्दल ज्यांना ज्यांना म्हणून काही भावना आहेत, मायलेकरांच्या थोर व पवित्र प्रेमाबद्दल ज्यांना ज्यांना म्हणून काय वाटत असेल, त्या सर्व अधिकृत रुचीच्या लहानथोर बंधुभगिनींस ‘श्यामची आई’ हे कथात्मक पुस्तक आवडेल व ते हृदयाशी धरतील, अशी साने गुरुजींना खात्री होती. आजही हे पुस्तक सर्व लहानथोरांना निश्चितच प्रेरणादायी आहे.
Share
