Skip to product information
1 of 1

Shudra Purvi Kon Hote?? By Dr. Babasaheb Ambedkar (शूद्र पूर्वी कोण होते?? -डॉ. बाबासाहेब आंबेडकर)

Shudra Purvi Kon Hote?? By Dr. Babasaheb Ambedkar (शूद्र पूर्वी कोण होते?? -डॉ. बाबासाहेब आंबेडकर)

Regular price Rs. 300.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 300.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language version
Quantity

शुद्रांच्या एकंदर परिस्थितीसंबंधी जे वाङ्मय अस्तित्वात आहे त्या वाङ्मयाची सथः स्थिती लक्षात घेतली तर या विषयावर आणखी एक पुस्तक प्रसिद्ध केले तर, हे पुस्तक अनाठायी आहे असे मानता येणार नाही; विन्वा ते पुस्तक एका उपेक्षणीय प्रत्राचा खल करीत आहे असेही म्हणता येणार नाही. हिन्दी आर्य लोकांची सामाजिक संघटना चातुर्वर्ष्याच्या सिद्धांतावर उभारलेली होती आणि चातुर्वर्ण्य म्हणजे ब्राहाण लोक (पुरोहित), क्षत्रिय लोक (लढवय्ये), वैश्य लोक (व्यापारी) आणि शूद्र लोक (हातकाम करणारे) अशा चार वर्गामध्ये केलेली समाजाची विभागणी होय असे सर्वसाधारण रूढ मत आहे. परंतु शूद्रांच्या प्रश्नाचे खरे स्वरूप काय आहे किंवा त्याचा विस्तार केवढा आहे, याबद्दलची कल्पना त्या मतावरून येत नाही. समाजाची विभागणी चार वर्गात करण्याशिवाय चातुर्वर्णाला दुसरे काही साधावयाचे नसते तर चातुर्वर्ण्य हे एक फार निरुपद्रवी तत्त्व आहे असे मानण्यात आले असते. दुर्दैवाने याच्यापेक्षा निराळा कावा चातुर्वर्णाच्या सिद्धांतात आहे. या सिद्धांताने समाजात भेदभाव उत्पन्न केला आणि चार वर्णांनी सामाजिक व्यवहारात परस्परांशी कसे वागावयाचे याची रूपरेषा त्या सिद्धांताने विषमतेच्या तत्त्वानुसार आखून ठेवली. त्याचप्रमाणे उच्चनीच भावनेच्या आधारावर उभारलेली विषमतेची पद्धत केवळ काल्पनिक स्वरूपाची नाही. तिच्यावर कायदेशीरपणाचा शिक्कामोर्तब केलेला आहे; त्या पद्धतीबरहुकूम एखाद्याने वर्तन केले नाही तर तो शिक्षेस पात्र होतो असे मूर्त स्वरूप चातुर्वण्यनि त्या पद्धतीला दिलेले आहे. चातुर्वण्यनि शूद्राला उच्चनीचपणाच्या शिडीच्या अगदी खालच्या पायरीवर ठेवलेले आहे, एवढेच नव्हे तर चातुर्वण्यनि त्याच्यावर असंख्य अपमानास्पद अटी व अपात्रतादर्शक बंधने लादली व यामुळे शूदाला जे नीच स्थान सामाजिक कायद्याने देण्यात आलेले आहे त्या स्थानापासून बरच्या स्थानाकडे जाण्याला त्याला सक्त मनाई करण्यात आलेली आहे. खरे पाहू गेले तर, हिंदू समाजात अस्पृश्यांचा पाचवा वर्ण उत्पन्न होईपर्यंत शूद्र म्हणजे नीचातला नीच माणूस असे हिंदूंना वाटत होते. शूद्रांच्या प्रश्नाचे स्वरूप कसे आहे याची यावरूनच कल्पना येते. हा प्रश्न किती महत्त्वाचा आहे याबद्दल लोकांना कल्पना नाही. याचे कारण हे की, शूद्रांची संख्या किती आहे हे समजून घेण्याची त्यांनी कधी पर्वा केली नाही. दुर्दैवाने, शिरगणतीच्या (सेन्सस रिपोर्ट) अहवालामध्ये त्यांची संख्या स्वतंत्रपणे निराळी दाखविलेली नाही. परंतु अस्पृश्यांची लोकसंख्या जमेस न धरली तर शूद्रांची लोकसंख्या हिंदूंच्या लोकसंख्येच्या मानाने ७५ ते ८० टक्के भरते

View full details