Shraddha By Uttam Kamble (श्राद्ध)
Shraddha By Uttam Kamble (श्राद्ध)
Couldn't load pickup availability
आबा, अरं चळवळ म्हंतूस; पन ती कुनासाठी करायची रं? चळवळ-बिळवळ म्हंतासा आणि आपलीच घरं तेवढी भरून घेतासा. आमाला मांगा-चांभारांना काय मिळालं ते तरी सांगशीला की नाय? आरं, या गावाच्या चावडीत पंच म्हणून जातुया तो म्हारच. एकदा मी बोललो तर म्हारं कशी म्हणाली, 'अरं, तुमची इन-मिन-तीन घरं. तीन घर असणाऱ्यांचा पंच करायचा व्हय?' ते राहू दे बाजूला. पंचायतीचा जो पैका म्हार-मांग-चांभारांसाठी हाय त्यातील एक पै तरी कधी आली चांभारास्नी? तुम्ही म्हारवाड्यात तक्क्या बांधला. झेंड्याचा कट्टा बांधला. तुमच्या गल्लीत नळ आलं. तुमच्या म्हारकास्नी तारांचं कुंपन आलं. हे सगळं कशान, तर पंचायतीच्या फंडानं. आज माळावर एवढी घरं उभारली; पण कुणी टीचभर जागा दिली का आंमास्नी? बघावं तवा तुम्हीच तुमच्या पोळीवर तूप वाढणार. आम्ही काय म्हणून तुमच्या मागं लागावं, रिकामचोटासारखं..."
Share
