Shodha Khoda Liha Bhag 1 ani 2 By Suhas Kulkarni ( शोधा खोदा लिहा (भाग १ आणि २)
Shodha Khoda Liha Bhag 1 ani 2 By Suhas Kulkarni ( शोधा खोदा लिहा (भाग १ आणि २)
Couldn't load pickup availability
१९९० ते २०१५ हा पंचवीस वर्षांचा काळ विलक्षण घडामोडींनी भारलेला आहे. जागतिकीकरण, जातीय अस्मिता अन् धार्मिक अभिमान या तीन प्रक्रिया या काळात उलगडल्या. त्याशिवाय गरिबांच्या-वंचितांच्या समस्या, शेतकरी-कामगारांची दुरवस्था, रुढी-परंपरांचा पगडा, स्त्रियांचं दुय्यमत्व, शहरीकरण आणि सर्व स्तरावरील सरकारी अनास्था अशा अनेक प्रश्नांनी आपलं जीवन घेरलेलं आहे.
समाजाला सतावणारे असे प्रश्न समजून घेणं हे ‘युनिक फीचर्स’ने सुरुवातीपासून आपलं काम मानलं. त्यासाठी त्यांचे पत्रकार गटागटाने गावाखेड्यात गेले, वस्त्याझोपड्यांत वावरले, रानावनात फिरले. समाजात जाऊन शोधाशोध केली, प्रचंड लेख लिहिले, दृष्टीआडचे प्रश्न वाचकांसमोर आणले.
अशा अनेक लेखांपैकी निवडक महत्त्वाच्या आणि संस्मरणीय लेखांचा हा दस्तावेज. समाजाच्या गेल्या पाव शतकाचं आत्मवृत्त सांगणारा.
Share
