Shivtej Prarana Sanch - 3 Pustakancha Sanch (शिवतेज प्रेरणा संच-३ पुस्तकांचा संच )
Shivtej Prarana Sanch - 3 Pustakancha Sanch (शिवतेज प्रेरणा संच-३ पुस्तकांचा संच )
Couldn't load pickup availability
शिवरायांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे । लेखक - नवनाथ जगताप | पाने - १७६
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका युगाचे नायक नव्हते; तर ते तेज, शौर्य आणि नीतीचे चालते-बोलते विद्यापीठ होते. शून्यातून स्वराज्य उभारणाऱ्या या युगपुरुषाचे व्यवस्थापन कौशल्य आणि दूरदृष्टी आजही कालातित आहे.
'शिवरायांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे' हे पुस्तक महाराजांच्या तेजस्वी चरित्रातून वेचलेले ५१ अमूल्य मंत्र आहेत. या सूत्रांमध्ये प्रभावी नेतृत्व, अचूक नियोजन, आपत्ती व्यवस्थापन आणि निस्सीम राष्ट्रप्रेमाची गुरुकिल्ली दडलेली आहे.
संकटांवर मात करण्याची प्रेरणा देणारे आणि जीवनाला नवी दिशा दाखवणारे शिवरायांच्या विचारांचे हे अमृत विद्यार्थ्यांपासून ते मोठ्या व्यावसायिकांपर्यंत, प्रत्येकासाठी एक तेजस्वी प्रकाशवाट आहे. इतिहासाच्या पानातून वर्तमानाला सामर्थ्य देणारा हा प्रेरणास्रोत तुम्ही नक्की वाचा!
शिवचरित्र छत्रपती शिवाजी महाराज -कृष्णराव अर्जुन केळूसकर | पाने - ५०४
छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र केळूसकरांनी लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली. मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवरायांचे मराठीतील हे चरित्र एक उत्तम उदाहरण आहे. केळूसकर गुरुजींचा हा ग्रंथ म्हणजे केवळ शिवाजी राजांचा चरित्रग्रंथ नसून त्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थकारण, नेतृत्व, चारित्र्य, मानवी संबंध अशा अनेक विषयांची तपशीलवार मांडणी आहे. हा युगपुरुष महाराष्ट्रदेशी अवतरला हे इथल्या रयतेचे भाग्य!
छत्रपती शिवाजी महाराज एका महान क्रांतीचे प्रवर्तक - डेनिस किनकेड | पाने 208
हे वेधक चरित्र छत्रपती शिवाजी महाराजांचा एका दृढनिश्चयी तरुण योद्धयापासून ते मराठा साम्राज्याची स्थापना करणाऱ्या एका दूरदृष्टी असलेल्या शासकापर्यंतचा जीवनप्रवास उलगडून दाखवते. किनकेड यांनी शिवाजी महाराजांच्या नाविन्यपूर्ण लष्करी रणनीती, उल्लेखनीय वैयक्तिक धैर्य आणि स्वराज्य व न्यायाप्रती असलेल्या त्यांच्या सखोल निष्ठेचा यात वेध घेतला आहे. ऐतिहासिक वर्णनाचा एक उत्कृष्ट नमुना असलेली ही कलाकृती अशा एका नेत्याला आपल्यासमोर उभी करते, ज्यांचा वारसा अनेक पिढ्यांना निरंतर प्रेरणा देत आला आहे.
Share
