Skip to product information
1 of 1

Shikshanachiye Dwari By Sandeep Wakchoure (शिक्षणाचिये द्वारी)

Shikshanachiye Dwari By Sandeep Wakchoure (शिक्षणाचिये द्वारी)

Regular price Rs. 255.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 255.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

आपण शाळेत रोज ‘प्रतिज्ञा’ म्हणतो, पण ती कधी आपल्या आचरणात येत नाही. ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत,’ हे शालेय आयुष्यानंतर सहसा आपल्या लक्षातही येत नाही. आपण श्रमाला प्रतिष्ठा देत नाही. खोट्या प्रतिष्ठेच्या मागे धावताना आजवर आपल्यावर जे मूल्यसंस्कार घडले, ते आपल्या खिजगणतीतही नसतात. हे सगळे का घडते? तर इथली व्यवस्थाच पोखरली गेली आहे. पाठ्यपुस्तकातील धडे गिरवताना आयुष्याकडून आपण कसलेही ‘धडे’ घेत नाही, ही शोकांतिका आहे. ‘माणसाकडे माणूस म्हणून पाहा,’ इतके साधे पण अत्यंत महत्त्वाचे सूत्र घेऊन सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक संदीप बाकचौरे ही पुस्तकमाला आपल्यासाठी घेऊन येत आहेत. बघता-बघता यातील हे दहावे पुस्तक प्रकाशित होत आहे. ‘देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी, तेणें मुक्ति चारी, साधियेल्या,’ हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितले. परमेश्वराशी संवाद साधण्यासाठी, त्याचे स्मरण करण्यासाठी त्याच्या दारी भक्तिभावाने थांबलेला एक क्षणही पुरेसा असतो, असे त्यांना सांगायचे आहे. हाच भाव संदीप वाकचौरे यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपल्यासमोर उभा केला आहे. ‘शिक्षणाचिये द्वारी आपण सर्व जण उभे असतोच! त्यातून राष्ट्रनिर्मितीस हातभार लावणारा आणि आपापसात आनंद पेरणारा ‘माणूस’ घडावा इतकी आपली शिक्षणव्यवस्था बळकट असावी.’ हे सारे कसे घडेल, याचे प्रांजळ, चिकित्सक चिंतन म्हणजे ‘शिक्षणाचिये द्वारी’ हे पुस्तक म्हणावे लागेल. – घनश्याम पाटील

View full details