Skip to product information
1 of 4

Set Of 3 Shriman Yogi+Mrutunjay+Chhava+Shri Shambhuchhatrapati Smarak Granth By Ranjeet Desai+Shivaji Sawant+Sushant Sanjay Udawant+

Set Of 3 Shriman Yogi+Mrutunjay+Chhava+Shri Shambhuchhatrapati Smarak Granth By Ranjeet Desai+Shivaji Sawant+Sushant Sanjay Udawant+

Regular price Rs. 1,639.00
Regular price Rs. 2,150.00 Sale price Rs. 1,639.00
24% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

प्रत्येक मराठी मनानं पूजलेला शक्तीरूप आदर्श.
मराठ्यांच्या किंबहुना भारताच्या इतिहासातील तेजानं लखलखणारा दीपस्तंभ.
इतका अपैलू, आवधानी संपूर्ण पुरूष इतिहासात दुसरा नाही. आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, परधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा मिळणे कठीण


असा हा कर्ण, भीष्माचं पतन होईपर्यंत समरांगणात पायच टाकणार नव्हता! इंद्रानं पूर्वीच त्याची कवचकुंडलं आपल्या पुत्रासाठी अर्जुनासाठी म्हणून दानाच्या मिषानं त्याच्यापासून हस्तगत केलीच होती. परशुरामांनी, ‘तुला ऐन युद्धाप्रसंगी ब्रह्मास्त्र स्फूरणार नाही.’ असा मर्मभेदी शाप त्याला दिला होता. महेंद्र पर्वतावरच्या ब्राह्मणाचे ‘तुझ्या रथाचं चक्र, भूमीही युद्धात अशीच रूतवून ठेवील!’ हे उद्गार कोणीही विसरू शकत नव्हतं. जगात अनेकांनी दान केलं असेल पण पण मरणाच्या दारातील एवढं चित्तथरारक, उत्तुंग एकनिष्ठ, अजोड दान तो एकटाच करू जाणत होता पहिला पांडव! ज्येष्ठ कौंतेय! अजोड दानवीर, सूर्यपुत्र!

‘राजा शिवाजी’ हा निर्विवाद सिंहपुरुष होता, परंतु शिवपुत्र ‘संभाजी’ हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्याने; पण पुरेपूर उमजले आहे. ‘छावा’च्या जोरदार स्वागताने ते सिद्धही झाले आहे. एकदोन नव्हे; तर एकाचवेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेनाधुरंधर! मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती एकमेव ‘संभाजी’च होऊन गेला. जंजिरेकर सिद्दी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीस लाखांची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब – या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती, स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच!


छत्रपती संभाजी महाराजांचे स्वतःचे नाणे होते का ? बुधभूषण ग्रंथात नेमके काय लिहलंय ? आज हा ग्रंथ आहे कुठे ? तब्बल नऊ वर्ष मुघलांच्या नाकी नऊ आणणारा मराठ्यांचा छत्रपती लढला कसा ? या सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी आमचा स्मारक ग्रंथ जरूर वाचा.

View full details