1
/
of
1
Seemepalikadun By Narayan Dharap (सीमेपलीकडून)
Seemepalikadun By Narayan Dharap (सीमेपलीकडून)
Regular price
Rs. 234.00
Regular price
Rs. 275.00
Sale price
Rs. 234.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
नारायण धारप यांचा हा काही पहिला भयकथा संग्रह नाही; पण त्यांच्या आजवर प्रकाशित झालेल्या दोनशे हून अधिक कथांमधील वैशिष्ट्ये याही कथांमध्ये आहेत. परिणामकारक भयकथेमध्ये वाचकांना त्यांचा अविश्वास क्षणभर दूर ठेवायला लावण्याची जी किमया असते ती या कथांमध्ये नक्कीच आहे. धारपांची भाषा चित्रमय आहे. वाचकांच्या डोळ्यांसमोर घटना प्रत्यक्ष उभी करण्याचे सामर्थ्य त्यांच्या भाषेत आणि लेखन शैलीत आहे. सीमेपलीकडून ही कथा पावलाच्या ठशाभोवती फिरणारी आहे बाथरूमच्या दरवाजाजवळ दिसणारा तो ओल्या पावलाचा ठसा कुणाचा, याचे रहस्य उलगडणारी ही कथा आहे. सीमेपलीकडून हा कथासंग्रह सुद्धा अशाच प्रकारे वाचकांच्या डोळ्यांसमोर घटना प्रत्यक्ष उभी करणारा आहे यातील एक रात्र - उलघालीची, वैरी, सुंदरी आणि पशु या सर्वच कथा मानवाची विचारशक्ती स्तब्ध करणाऱ्या आहेत. याशिवाय अमानवी विश्वासाठी जे तर्कशास्त्र निर्माण केलेले आहे त्याच्याशी या सर्व भयकथा सुसंगत आहेत.
Share
