Skip to product information
1 of 4

Ruchira + Ruchakar + Annapurna + Saptahik Sakal Diwali faral Diwali Ank Set 2024 (रुचिरा + रुचकर + अन्नपूर्णा + साप्ताहिक सकाळ दिवाळी फराळ दिवाळी अंक २०२४ )

Ruchira + Ruchakar + Annapurna + Saptahik Sakal Diwali faral Diwali Ank Set 2024 (रुचिरा + रुचकर + अन्नपूर्णा + साप्ताहिक सकाळ दिवाळी फराळ दिवाळी अंक २०२४ )

Regular price Rs. 590.00
Regular price Rs. 655.00 Sale price Rs. 590.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

पाककला म्हणजे रुचकर, चविष्ट आणि पोषक पदार्थ बनविण्याची कला किंवा शास्त्र हे अंक सवलतीमध्ये उपलब्ध 

# रुचिरा + रुचकर + अन्नपूर्णा + साप्ताहिक सकाळ दिवाळी फराळ  दिवाळी अंक २०२४ # 
 

# रुचिरा # 
'रुचिरा' हा विविध पाककृतींची रेलचेल असणारा आणि महिलांमध्ये लोकप्रिय असा विशेष अंक आहे. या अंकात भाताचे प्रकार, पंचपक्वान्नांची मेजवानी, चायनिज मेनू, साऊथ मेनू, विविध चटण्या लोणची, हवाहवासा वाटणारा पराठा, पिझ्झा बर्गर सँडविच, चटपटा चाट, पालेभाज्यांचे प्रकार, विविध कोशिंबीरी, टोमॅटोच्या पाककृती, चमचमीत मेनू अशा विविध पाककृतींची रेसिपी दिलेली आहे जी महिलांना करायला सोप्पी जाईल आणि पाककृती हटकेच होतील, ज्या घरातल्या सगळ्यांनाच आवडतील. पाककृतींमध्ये विविधता तर आहेच शिवाय अनेक गोड, तिखट, चमचमीत, लाजबाब चवींच्या पदार्थांचा समावेश केलेला आहे.

#  रुचकर  #
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चविष्ट, खमंग, कुरकुरीत, मसालेदार, विविध रुचकर पदार्थ खायला आवडतात. रुचकर मधेही.. उपवासाचे पदार्थ, चीज दह्याचे पदार्थ, चिकनचे चटकदार विविध प्रकार, पंजाबी नॉनव्हेज पाककृती, गोव्याचे शाकाहारी पदार्थ, सूप्स रेसिपीज, विविध बिस्किटे, शाकाहारी केक, साठवणीचे पदार्थ, खट्टे मिठे सरबते, कढी विविध प्रकार अशा विविध पाककृतीच्या रेसिपीज् दिल्या आहेत. तसेच सौ. वैशाली खाडिलकर यांच्या 'जेवणाच्या ताटातले डावे' ह्या विशेष पाककृती आहेत. ज्या करायला अगदी सोप्प्या आहेत. - ज्या नक्कीच चविष्ट बनतील अशी खात्री आहे.

अन्नपूर्णा 
( अन्नपूर्णा दिवाळी अंक 2024 ) हा खास पाककृती प्रेमींना उद्देशून बनवलेला दिवाळी अंक आहे. यामध्ये पारंपारिक महाराष्ट्रीयन सणांच्या विविध स्वादिष्ट रेसिपीज आणि सणासुदीच्या वेळी स्वयंपाकाचे तंत्र समजून घेण्यासाठी उपयुक्त टिप्स दिलेल्या आहेत. यामध्ये घरात सहज बनवता येतील अशा खास रेसिपीज आहेत, ज्या तुमच्या कुटुंबाच्या दिवाळीच्या आनंदात भर घालतील. नवशिक्या पासून अनुभवी गृहिणींपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त असा हा अंक आहे.

साप्ताहिक फराळ 
प्रत्येक घरातल्या फराळाचे पदार्थ करण्याच्या पाककृती वेगवेगळ्या असल्या, तरी त्या पदार्थांचा गोडवा एकसारखाच असतो, यात मात्र (अक्षरशः) 'तीळ 'मात्रही शंका नाही. साप्ताहिक सकाळच्या या फराळ विशेषांकात असलेल्या फराळाच्या काही पारंपरिक आणि काही हटके रेसिपी तुमच्या नक्की उपयोगाला येतील...

View full details