Rashatriy Swayamsevak Sangh : Ek Shatakachi Vaatchal By Dr. Sharad Kunte (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : एक शतकाची वाटचाल)
Rashatriy Swayamsevak Sangh : Ek Shatakachi Vaatchal By Dr. Sharad Kunte (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : एक शतकाची वाटचाल)
Couldn't load pickup availability
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेली संघटना आज सर्व जगामध्ये चर्चेचा विषय झालेली आहे. १०० वर्षांत सातत्याने या संघटनेचा विस्तार होत गेला. आज सुमारे ८०,००० गावापर्यंत संघाच्या शाखा किंवा साप्ताहिक मीलनाचे कार्यक्रम सुरु आहेत. देशभरामध्ये असलेल्या संघ स्वयंसेवकांची संख्या दोन ते तीन कोटींच्या घरात आहे. संघ स्वयंसेवकांनी समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी समविचारी ५५ देशव्यापी संस्थांची निर्मिती केली आहे. पावणे दोन लाखांपेक्षा अधिक सेवाकार्ये या सर्व संस्थांच्या मार्फत देशभर चालतात. संघ व समविचारी संस्थांची एकूण सदस्य संख्या १५ ते २० कोटींपर्यंत जाऊन पोहोचते. देशाबाहेर ज्या ज्या ठिकाणी हिंदू आहेत, त्या ठिकाणी संघ अथवा संघाच्या समविचारी संस्थांनी काही ना काही रचनात्मक काम सुरु केलेले आहे. संघ व संघ परिवार देशाच्या इतिहासातील हे एक सोन्याचे पाण म्हणावे लागेल. ते सोनेरी पान उलगडून आपल्यासमोर ठेवताना स्नेहल प्रकाशनाला मनापासून आनंद होत आहे.
Share
