Rudra Enterprises , Free express shipping with orders over ₹ 1499
TOP DIWALI ANK
Your cart is empty now.
`नितीन गडकरी म्हणजे केवळ एक राजकीय नेते' अशा नजरेने पाहिल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध विलोभनीय पैलू जाणवणार नाहीत. हे पैलू पारखले, तरच या नेत्याचे सर्वंकष व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यापुढे उभे राहील. आपल्या जीवनप्रवासात नितीन गडकरींनी कर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवला आहे. सार्वजनिक आणि राजकीय जीवनात अनेक निर्णय घेताना त्यांनी काय पथ्ये पाळली, त्यांच्या विचारांवर आणि मनोभूमिकेवर कुणाकुणाचा कसकसा प्रभाव पडला, अनेक समस्यांवर मात करताना त्यांनी दाखवलेली धैर्य, इच्छाशक्ती आणि सकारात्मकता त्यांना कुठून मिळते - अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी नितीन गडकरींच्या जीवनाचा आढावा घ्यायला हवा. `चौकटी मोडणारा धुरंधर नेता : नितीन गडकरी' हे पुस्तक वाचकांना अशी संधी उपलब्ध करून देत आहे. नितीन गडकरींनी अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीत आयुष्याच्या प्रवासाला प्रारंभ केला. आपल्या दृढनिर्धाराच्या बळावर त्यांनी आजचे असाधारण स्थान प्राप्त केले. ही सर्व वाटचाल काही सोपी आणि साधी सरळ नव्हती. त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला असणार, अनेक आव्हानांशी संघर्ष करावा लागला असणार. त्यांनी आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध आणि प्रगल्भ करण्यासाठी स्वत:च्या अंतर्मनातील एकाग्रतेवर भर दिला. आपल्या जीवनातील कक्षा व्यापक बनवण्यासाठी ज्या कौशल्यांची गरज जाणवली, ती कौशल्ये त्यांनी व्यापक व्यासंगाच्या आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अंगी बाणवली. आत्मव्यवस्थापन हा त्यांच्या आयुष्याचा मूलमंत्र ठरला. या मूलमंत्राच्या आधारे जीवनातील उच्च ध्येये आपण गाठू शकतो, हे नितीन गडकरींच्या प्रत्यक्ष उदाहरणाने वाचकांसमोर मांडणारे पुस्तक म्हणजे `चौकटी मोडणारा धुरंधर नेता : नितीन गडकरी'.
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books