Overtake By Chandralekha Belsare (ओव्हरटेक)
Overtake By Chandralekha Belsare (ओव्हरटेक)
Couldn't load pickup availability
सौ. चंद्रलेखा बेलसरे यांच्या कथा वाचताना मला नेहमी वाटतं की, भूतं जर एवढी चांगली असती, तर आमच्या नशिबात अशी चांगली भूतं येण्याऐवजी अनेक रडगाणी गाणारी माणसंच का येतात? मृत्यू आणि त्यानंतरचे जग हा अनेकांसाठी औत्सुक्याचा विषय असतो. माणूस मेला की संपला, त्याची राख झाली असं माझ्यासारख्या विज्ञाननिष्ठ माणसाला वाटतं. तरीही या गूढ जगाविषयी जगभर अनेकांचे अनेक अनुभव असतात. मराठी साहित्यात सलगपणे पाचवा गूढकथासंग्रह प्रकाशित झाल्याने चंद्रलेखा बेलसरे यांचे गूढकथासंग्रहाच्या प्रांतातील वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध झाले आहे.
प्रस्तुत पुस्तकातील नऊ कथा वाचकांना वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. प्रत्येकाचा वेगवेगळ्या कारणाने मृत्यू झालेला असला तरी हे प्रेतात्मे सूडाने पेटलेले नाहीत. मृत्यूनंतरही संबंधितांचे भलेच व्हावे असा नेक विचार ते करतात. कोविडच्या काळात असंख्य लोकांची सेवा करताना आपले संपूर्ण कुटुंब गमावून स्वतःही मृत्युला सामोरे जाणाऱ्या एका डॉक्टरची कथा आहे. मृत्यूनंतरही तो आपल्या डॉक्टर प्रेयसीला साथ देत तिच्या भवितव्याचा विचार करून तिला एका होतकरू अभियंत्यासोबत लग्नासाठी प्रेरित करतो. हे तर्कबुद्धीला न पटणारे असले तरी त्यांच्या भाव-भावनांची गुंफण बेलसरे यांनी अतिशय समर्पक शब्दांत केली आहे. ‘पुनर्जन्म’ कथेतील गायत्रीसुद्धा मनाची अशीच पकड घेते.
थोडक्यात सांगायचे तर, भुते ही वाईट, खुनशी, सूडबुद्धीने वागणारी आणि जिवंत माणसांना त्रास देणारीच असतात ही ‘अंधश्रद्धा’ खोडून काढण्याचे काम चंद्रलेखा बेलसरे त्यांच्या कथांच्या माध्यमातून प्रभावीपणे करतात. आपल्याला एका वेगळ्या विश्वाचे दर्शन घडविणाऱ्या या कथा वाचायलाच हव्यात.
- घनश्याम पाटील
Share
