Skip to product information
1 of 2

Orwellchya Avtibhovati By Dr. Anand Joshi (ऑर्वेलच्या अवतीभोवती)

Orwellchya Avtibhovati By Dr. Anand Joshi (ऑर्वेलच्या अवतीभोवती)

Regular price Rs. 196.00
Regular price Rs. 230.00 Sale price Rs. 196.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

लहानपणापासून आपण आपल्या भोवती कोश विणत असतो. हा कोश असतो, अनुभवांचा, कल्पनांचा, विचारांचा. रोज आपण नव्यानं जन्म घेतो. कात मागे टाकतो, स्मृतिकोशात कुठंतरी. जसजसे मोठे होतो, तसे शिक्षण, वाचन, चित्रपट, नाटक, अनंत गोष्टी, अनेक अनुभव, अशा धाग्यांचे आवरण आपण विणतो. हे अगदी बालपणापासून वृद्धापकाळापर्यंत सुरू राहतं. दररोज आपण कात टाकतो आणि नवे झालेलो असतो. तुम्ही काय वाचता, पाहता, कोणाच्या संपर्कात येता, आलेली संकटं आणि सुखाचे दिवसही, हे धागे कोश बनवतात. प्रत्येक दिवसाचा प्रत्येकाचा कोशेटा निराळा. काही कोश विस्मृतीत जातात. काही टिकतात. पण, त्यांनी आपल्याला घडवण्याचं काम केलेलं असतं. मला मात्र वाचनानं निर्माण केलेले कोश मौल्यवान वाटतात. वाचनसोनचुऱ्याच्या कोशानं मला घडवलं आहे. भारतीय संस्कृतीत अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय असे पंचकोश सांगितले आहेत. मी त्याच्यात वाचनमयकोश या सहाव्याची भर घालतो. माझ्या या वाचनमयकोशाचे काही धागे ऑर्वेलच्या साहित्यकृर्तीचे आहेत.

View full details