Nisargach Nayanramya Lenn Karwar By Vitthal Ray Bhat , Rajesh Divekar (निसर्गाच नयनरम्य लेण कारवार -विठ्ठल राय भट , राजेश दिवेकर )
Nisargach Nayanramya Lenn Karwar By Vitthal Ray Bhat , Rajesh Divekar (निसर्गाच नयनरम्य लेण कारवार -विठ्ठल राय भट , राजेश दिवेकर )
Couldn't load pickup availability
मनोगत
रावणाचा वध केल्यावर प्रभू श्रीराम-बंधु लक्ष्मण व पत्नी सीता यांच्यासह आयोध्येकडे कूच करण्याच्या तयारीत होते. तेव्हा विभीषणाने रामानां, "प्रभो, तुम्ही लंका जिंकलेली आहे. तुम्हीच लंकाधिपती व्हा व इथेच रहा." अशी गळ घातली. त्यासाठी विभीषणाने लक्ष्मणाचे मन अगोदरच वळवून घेतले होते. पण | रामचंद्राने ती मागणी अमान्य करत सांगितले, "लक्ष्मणा, लंका सुंदर, समृद्ध व सुवर्णमयी आहे हे खरे आहे. तरी पण मला ती आवडत नाही. कारण जननी व जन्मभूमी ही मला स्वर्गाहुनी श्रेष्ठ वाटतात."
कारवार जिल्हा, हा पूर्वी 'बॉम्बे प्रेसिडेन्सी' मध्ये धारवाड, बेळगांव व विजापूर या तीन जिल्ह्यांसह 'बॉम्बे कर्नाटक' म्हणून ओळखला जात होता. भाषावार प्रांत रचनेच्या वेळी 'बॉम्बे प्रेसिडेन्सी' तून गुजरात व महाराष्ट्र अशी दोन वेगळी राज्ये निर्माण करण्यात आली व 'बॉम्बे कर्नाटका'तील चार जिल्हे हे कर्नाटक राज्यात समाविष्ट करण्यास आले.
पूर्वी कारवार जिल्ह्यातील, लोक साहजिकच नोकरी-धंदा निमित्त मुंबईला जात असत. सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात मुंबईत स्थायिक व मग जगभर पसरला. असे असलेतरी कारवारी माणूस आपली जन्मभूमी, मायभाषा कोकणी व संस्कार विसरला नाही. त्याची नाळ कारवारशी घट्ट जुळलेली आहे. नव्या पिढीला कारवारची व कोंकणीची तेवढीशी माहिती नाही हे खरं आहे. त्यांना आपल्या भूमीबाबत जबरदस्त कुतूहल आहे. पाने 104
Share
