Naturutu By Indrajit Bhalerao (नातूऋतु)
Naturutu By Indrajit Bhalerao (नातूऋतु)
Couldn't load pickup availability
बालमित्रांनो, इंद्रजित भालेराव हे मराठी भाषेतील एक लोकप्रिय कवी आहेत. त्यांच्या कवितेत निसर्ग आणि शेतकरीजीवन प्रामुख्याने येत असते. अगदी सुरुवातीपासून त्यांनी प्रौढांसोबत मुलांसाठीही कवितालेखन केलेले आहे. त्यांचा 'गावाकडं' हा मुलांसाठी लिहिलेल्या कवितांचा संग्रह खूप गाजला. त्यांच्या कविता शालेय पुस्तकात असतात. त्यांची 'बाप' ही कविता पूर्वी पाचवीत होती आणि ती प्रचंड लोकप्रिय होती, तर सध्या 'दोस्त' ही कविता तिसरीच्या पुस्तकात आहे आणि तीही तेवढीच लोकप्रिय आहे. इंद्रजित भालेराव हे आपल्या कवितांच्या लडीवाळ सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांच्या काव्यवाचनाचे कार्यक्रम शाळांमधून होत असतात. बालकुमार साहित्यसंमेलनांमधून हजारो मुलांना रंगवून आणि गुंगवून ठेवण्याचे काम त्यांच्या कवितांनी केलेले आहे. विद्यार्थी त्यांच्या कविता ऐकताना टाळ्यांच्या तालात बेभान होतात. आता ते तुमच्यासाठी तीन नवे संग्रह घेऊन येत आहेत. 'रानमळ्याची वाट' हा निसर्गाकडे घेऊन जाणारा, 'गाणे गोजिरवाणे' हा आपल्या लोकसंस्कृतीकडे घेऊन जाणारा आणि 'नातूऋतु' हा एका आजोबांना आपल्या बालपणात घेऊन जाणारा कवितासंग्रह आहे. फार दिवसानंतर या तीन कवितासंग्रहातून इंद्रजित भालेराव यांची नवी कविता कुमारवाचकांसमोर येत आहे. ही तुमच्यासाठी मोठीच पर्वणी आहे. हे सगळे शब्दधन तुमच्याकडे सोपवताना आदित्य प्रकाशनाला खूप खूप आनंद होतो आहे. या कविता वाचा आणि तुमचे आयुष्य समृद्ध करून घ्या ! तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !!
Share
