Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)

नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी

Rs. 1,150.00Rs. 1,035.00
Availability: 0 left in stock

# मौज +अक्षरधारा +उत्तम अनुवाद दिवाळी अंक २०२४ #
विशेष सावलीमध्ये उपलब्ध 
# मौज #
जगभरचे अस्थिर वातावरण... रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायलचा इराण आदी देशांमधला तणाव, बांगला देशातील अराजकता, कॅनडा-भारत यांच्या संबंधांत निर्माण झालेली तेढ, महाराष्ट्रातल्या बदलापूरमधे शालेय लहानग्या मुलींवरचे अत्याचार...एक ना अनेक. अराजकतेचे, हिंसाचाराचे, अस्थिरतेचे हे झाकोळून टाकणारे गलिच्छपण खिन्नतेने अनुभवत असताना अवचितपणे मराठी भाषेवर उमटलेली 'अभिजात' पणाची लखलखीत मोहोर ! अडीच हजार वर्षे आपले अस्तित्व जपत, तेवत असलेल्या 'अमृतातेहि पैजा जिंके' अशा आपल्या मराठी भाषेच्या अक्षयदीपाला जणू यामुळे लक्ष लक्ष दिव्यांचे ओज प्राप्त झाले! खरेतर मराठीचे अभिजातपण, तिची स्वयंसिद्धता शातवाहन काळापासूनच सिद्ध होती. हा आनंद द्विगुणित करणारी अभिजात मराठीतील दिवाळी अंकांची परंपरा! या परंपरेला एकशे दोन वर्षे साक्षी राहत, कसदार वाङ्मयाचा आग्रह बाळगत, सातत्याने दिमाखात प्रकाशित होत असलेला 'मौज'चा दिवाळी अंक. मौजचा २०२४चा हा अंक वाचकांच्या हाती देताना आगळे समाधान वाटत आहे. याही अंकावर नजर टाकली तर काही विशेष पैलू वाचकांच्या सहजी नजरेत येतील.

 # अक्षरधारा # 
काम करणारे प्रसाद कुमठेकर यांनी लिहिलेला विशेष • लेख आहे, 'चंबळच्या खोऱ्यात'. ज्येष्ठ, अनुभवी, - बुद्धिमान लेखिका आणि अगदी आजच्या पिढीतले सर्जनशील, अनेक माध्यमांत वावरत असणारे गुणी लेखक, यांच्याबरोबर काम करण्याचा मोठा आनंद आहे. अर्थात हा लेख आवर्जून वाचावा असाच झाला आहे. वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळ्या धाटणीच्या कथा हे 'अक्षरधारा दिवाळी अंका'चे खास वेगळेपण ! या अंकातही गणेश मतकरी, विश्वास पाटील, किरण यज्ञोपवित, पंकज भोसले, विशाखा विश्वनाथ. यांच्या कथा आहेत. शिवाय हारूकी मुराकामी या जगभरात वाचक असणाऱ्या लेखकाची, बर्थ डे गर्ल ही गिरीश मांडके यांनी अनुवादित केलेली वेगळा अनुभव देणारी कथा आहे.

# उत्तम अनुवाद # 
या वीस वर्षांत केवळ अनुवादित साहित्य प्रसिद्ध करणारा एक दर्जेदार दिवाळी अंक म्हणून जसा 'उत्तम अनुवाद'ने नावलौकिक मिळवला, तसाच एकाच वेळी लोकप्रिय आणि प्रयोगशील अंक म्हणूनही अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. २०१० पासून एक विषय घेऊन त्याची वाङ्मयीन चर्चा अंकात होऊ लागली. यातून नोबेल-ज्ञानपीठ (२०१०), जागतिक नियतकालिके (२०११), सिनेमा (२०१३), युद्ध (२०१४), प्रवास (२०१५), स्मृति-विस्मृती (२०१६), सहवास (२०१७), हद्दपार-निर्वासन (२०१९), आपत्तीकाळातील साहित्य (२०२०), स्वातंत्र्य (२०२१), विस्मृतीत गेलेल्या गोष्टी (२०२२) आणि भूमी (२०२३) असे विशेषांक सिद्ध झाले. २०१९मध्ये 'काश्मीर' या विषयाचा उपविभाग केला, तेव्हा काश्मीर हा विषय काहीसा समाजविस्मृतीमध्ये गेला होता. अंकामध्ये साहित्यप्रकारांचेही वैविध्य हवे म्हणून कथा, कविता आणि लेख यांच्यासोबत नाटक, एकांकिका, भाषणे, पत्र, काही साहित्यकृतींचे अंश, मुलाखती आवर्जून समाविष्ट केल्या होत्या. हे करत असताना अधिकाधिक साहित्य मूळ भाषेतून असावे याबाबतही कटाक्ष राहिला. 

Click here to be notified by email when this product becomes available.

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymaestromasterpaypalvisa

Orders Ship Within 3 To 5 Business Days.

Mouj +Akshardhara+Uttam Anuvad Diwali Ank 2024(मौज+अक्षरधारा +उत्तम अनुवाद दिवाळी अंक 2024)

Recently Viewed

Recently Viewed Books