Mossad By Ronald Payne, Jui Palekar Paralikar(Translators) (मोसाद)
Mossad By Ronald Payne, Jui Palekar Paralikar(Translators) (मोसाद)
Couldn't load pickup availability
जगातील अन्य कोणत्याही देशाची गुप्तचर यंत्रणा इस्रायलच्या मोसादइतकी मिथक आणि रहस्यांनी वेढलेली नाही. सीआयएने 'जगातील सर्वोत्कृष्ट गुप्तचर संस्था' असे मोसादबद्दल उद्गार काढलेले आहेत. मोसादचे नाव निघाले की, इस्रायलचे मित्र आदराने बघतात तर शत्रूच्या मनात भय उत्पन्न होते. खरंतर १९४०मधील इस्रायलच्या निर्मितीपासून, मोसाद हे त्यांच्या जगण्याच्या सततच्या संघर्षातले महत्त्वाचे शस्त्र आहे.
मोसादने घडवून आणलेल्या एंटेबे विमानतळावरील धडक कारवाईमध्ये केलेली इस्रायली ओलिसांची नेत्रदीपक सुटका आजसुद्धा गुप्तहेरांच्या जगात एक चमत्कार समजली जाते. तसेच इराकची अणुभट्टी नष्ट करण्यासाठी ज्याप्रकारे मोसाद एजंट्सनी इस्रायली वायुसेनेला बॉम्बरचे लक्ष्य निश्चित करून दिले होते, ती कामगिरीदेखील उल्लेखनीय आहे.
हे पुस्तक म्हणजे मोसादचा पहिला संपूर्ण इतिहास होय. अंगावर शहारे आणणाऱ्या एखाद्या थ्रिलरसारखा हा इतिहास वाटतो; परंतु त्यातील प्रत्येक शब्द खरा आहे. अतिशय तटस्थ राहून मोसादमधील ऐतिहासिक घटनांच्या कारणांची आणि परिणामांची मीमांसा करण्यात लेखक यशस्वी ठरतात. आणि हेच या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
आपल्या नवनिर्मित देशासाठी प्राणालाही तुच्छ लेखणाऱ्या मोसाद एजंट्सच्या विविध कारवाया आणि दहशतवादविरोधी तंत्रं यांच्या अविश्वसनीय कथा या पुस्तकात आहेत. गुप्तहेरांचे आयुष्य कितीही कठीण असले तरी त्यांची देशभक्ती किती प्रखर असू शकते हे या कथा सांगतात.
Share
