Mojmapanachi Gamatidar Duniya : Bhag 4 By Dilip Herlekar(मोजमापनाची गमतीदार दुनिया : भाग 4)
Mojmapanachi Gamatidar Duniya : Bhag 4 By Dilip Herlekar(मोजमापनाची गमतीदार दुनिया : भाग 4)
Couldn't load pickup availability
माणसाला आपल्या गरज पूर्ण करण्यासाठी परस्परांमध्ये देवाणघेवाण करावी लागते. या देवाणघेवाणीच्या व्यवहारातूनच मोजमापनाचा जन्म झाला. पुढे वास्तूच्या बदलत्या वस्तू देताना त्यातील ढोबळपणा घालवून प्रमाणाची अचूकता ठरवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. त्यातून मोजणीसाठी एकक ठरवणं, मोजमापनासाठी खास साधनं आणि पद्धती अवलंबन व वस्तूच्या मापनाप्रमाणे तिची किंमत चलनी रूपात मान्य करणं अशा गोष्टी टप्प्याटप्प्याने विकसित होत गेल्या. त्यातही एकवाक्यता यावी म्हणून जागतिक पातळीवर लांबीकरिता मीटर, द्रव्यमानाकरिता किलोग्रॅम, कालावधीकरिता सेकेंद, विद्युत प्रवाहाकरिता अँपिअर, तापमानाकरिता केल्व्हिन व प्रकाशाच्या दीप्ती तीव्रतेकरिता कॅडेला अशा मूलभूत राशी निश्चित केल्या गेल्या. त्यातूनच लांबी, रुंदी, उंची, खोली, क्षेत्रफळ, वजन, वेळ यासह अनेक गोष्टींचं अचूक मापन करण्याचं तंत्र जसंजसं विकसित होत गेलं, तसातसा विज्ञान-तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांचा विकास सहजसाध्य हो गेला. अर्थात मोजमापनाच्या तंत्रात झालेला हा क्रांतिकारी बदल अचानक घडून आलेला नाही. त्यामागे अनेकांनी आपल्या आयुष्यातला दिलेला मोठा काळ आहे, शेकडो वर्षांची संशोधन प्रक्रिया आहे. ती कशी घडली आणि त्यातून आजच्या विकसित तंत्रांपर्यंत मनुष्य कसा पोहोचला याचा मनोरंजक वेध घेणारं हे पुस्तक. ते विध्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या जिज्ञासूंना अत्यंत उपयुक्त ठरेल अशी अशा आहे...
Share
