Micro Finance Don Pustakancha Sanch By Sanjeev Chandorkar (मायक्रो फायनान्स दोन पुस्तकांचा संच)
Micro Finance Don Pustakancha Sanch By Sanjeev Chandorkar (मायक्रो फायनान्स दोन पुस्तकांचा संच)
Couldn't load pickup availability
गेली ३० वर्षे राबवल्या जात असलेल्या नवउदारमतवादी आर्थिक धोरणांमुळे, देशातील कोट्यवधी गरीब / निम्न मध्यमवर्गीयांना मोठ्या प्रमाणावर कर्जे काढणे भाग पडत आहे. शेती, अनौपचारिक क्षेत्रातील रोजगार, स्वयंरोजगारातून मिळणारे उत्पन्न वाढत नाहीच आहे; आता त्यातील लक्षणीय हिस्सा कर्जाचे हप्ते / ईएमआय भरण्यात खर्ची पडत आहे. परिणामी राहणीमानाची किमान गुणवत्ता टिकवण्यासाठी हातात कमी पैसे उरत आहेत. राहणीमान टिकवण्यासाठी आणि हप्ते / ईएमआय भरण्यासाठी काही जणांना पुन्हा नवीन कर्जे काढावी लागत आहेत. अशी कुटुंबे पुढची अनेक वर्षे कर्ज सापळ्यात अडकण्याची भीती आहे. कर्ज वसुलीच्या वेळी होणारी हिंसा, मानहानी, कर्जाचे हप्ते फेडण्याच्या ताणाखाली सतत राहणे… हे सारे सहन न होऊन कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. हे सारे खूप गंभीर आहे.
म्हणून जे काही घडत आहे ते तसे का घडत आहे याची माहिती घेतली पाहिजे.
***
हा दोन पुस्तकांचा संच आहे. दोन्ही पुस्तकांतील मजकूर परस्पर पूरक आहे. वाचकांना विनंती की, दोन्ही पुस्तके जरूर एकत्रितपणेच वाचावीत.
पुस्तक क्रमांक : एक
मायक्रो फायनान्स : गरिबांसाठी ‘तारक’ का ‘मारक’.
हे पुस्तक खास करून मायक्रो फायनान्स क्षेत्राकडून मोठ्या प्रमाणावर कर्जे घेणाऱ्या गरीब/निम्न मध्यमवर्गातील भावाबहिणींसाठी आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आहे.
पुस्तक क्रमांक : दोन
मायक्रो फायनान्स राजकीय अर्थव्यवस्था.
हे पुस्तक जागतिक आणि देशाच्या राजकीय अर्थव्यवस्थेत झालेले आणि होत असलेले मोठे बदल, मायक्रो फायनान्स क्षेत्र आणि त्याच्या ग्राहकांना कसे प्रभावित करत आहे हे समजावून सांगण्यासाठी आहे.
Share
