Mi Kon Aahe By Osho, Pratik Puri(Translator) (मी कोण आहे)
Mi Kon Aahe By Osho, Pratik Puri(Translator) (मी कोण आहे)
Couldn't load pickup availability
तुमच्या आत प्रश्न आहेत? तुमच्या आत तुमचे प्रश्न आहेत? हे आयुष्य तुमच्या मनात प्रश्न उठवत नाही का? हे आयुष्य तुम्हाला कुतुहलाने भरून टाकत नाही का? है आयुष्य तुमच्नासमोर प्रश्न उपस्थित करत नाही का, की भी कोण आहे? हे काय आहे? तुम्ही ठार बहिरे आणि आंधळे आहात का? तुमच्या हृदयात कोणते, कोणतेच कुतूहल जागे होत नाही का? जर जागे होत असेल एखादे कुतूहल, जर उठत असेल एखादा प्रश्न, जर मनात जागी होत असेल एखादी तहान समजून घेण्याची, ओळखण्याची, आयुष्याचे सत्य मिळवण्याची, तर ती एकत्र करून घ्या आणि त्याला एक प्रश्न होऊ द्या. कारण जो इतर गोष्टींसंबंधी काही विचारायला जातो, तो दूर निघून गेला आहे, त्याने मूलभूत प्रश्न मागे सोडून दिला आहे. मूलभूत प्रश्न तर स्वतःपासूनच सुरु होतो- मी कोण आहे? ओशो पुस्तकातील काही महत्वाचे विषय-बिंदू: ध्यान य जीवनात श्वासाचे महत्व ध्यानाचा उद्देश काय आहे? ध्यानाचा अर्थ आयुष्य कसे जगावे, त्याचा उद्देश काय आहे? धर्माला वैज्ञानिक होण्याची गरज आहे का?
Share
