Meditations By Marcus Aurelius, Rama Nadegowda(Translators) ( मेडिटेशन्स )
Meditations By Marcus Aurelius, Rama Nadegowda(Translators) ( मेडिटेशन्स )
मार्कस ऑरेलियसचा जन्म १२१ सालचा. वयाच्या २१व्या वर्षी तो रोमचा 'सहसम्राट' झाला. त्याने जर्मेनिया आणि रिशा जिंकून रोमन साम्राज्याचा विस्तार केला. जर्मेनिया आणि रिशा हे प्रदेश म्हणजे आजच्या काळातील जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड आणि नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्समधील काही प्रदेश होते. ह्याच अर्थ असा, की युरोप खंडामधील बहुतेक सगळ्या प्रदेशावर मार्कस ऑरलियसचे आधिपत्य होते. ऑरेलियसने एपिक्टिटसकडून स्थितप्रज्ञता या विषयाचे शिक्षण घेतले. त्याने स्वतः लिहिलेल्या आणि प्रकाशित केलेल्या 'मेडिटेशन्स' या एकमेव ग्रंथात, त्याने एपिक्टिटसकडून स्थितप्रज्ञतेविषयी मिळालेली शिकवण उद्धृत केली आहे. या ग्रंथात त्याने व्यक्तिगत विचार आणि त्याच्या अंतर्मनाने दिलेले तात्त्विक दृष्टिकोन आणि कल्पना मांडल्या आहेत. हे विचार, तात्विक दृष्टिकोन आणि कल्पना मार्कस ऑरलियस सम्म्राटपदावर असतानाच्या अत्यंत तणावांच्या काळात लिहून ठेवले होते. या ग्रंथात स्थितप्रज्ञतेवरील औपचारिक व्याख्याने लिहिलेली नसून, भोवतालचे जग आणि स्वतःला जाणून घेऊन सत्त्वशील आयुष्य कसे जगावे, द्यासंबंधी कल्पना आणि विचार करून प्रगट केलेला सखोल दृष्टिकोन मांडला आहे.