Mala IAS Vhaychey ! By Mukesh Kumar, Anjali Dhanorkar (Translator) (मला IAS व्हायचंय !)
Mala IAS Vhaychey ! By Mukesh Kumar, Anjali Dhanorkar (Translator) (मला IAS व्हायचंय !)
Couldn't load pickup availability
IAS बनण्यासाठी UPSC ही भारतातील सर्वाधिक प्रातिष्ठित परीक्षा असून जगातील अत्यंत कठीण अशा परीक्षांमध्ये तिची गणना होते. एकवेळ एव्हरेस्ट सर करणं या परीक्षेपेक्षा सोपं असेल असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. किंबहुना हेच या परीक्षेचं वैशिष्ट्य आहे. पूर्ण परीक्षा आणि मुलाखत अशा तिहेरी प्रक्रियेतून ज्या विद्यार्थ्याची निवड होते होते तो विद्यार्थी निश्चितच एक प्रतिभासंपन्न विद्यार्थी असतो.
या परीक्षेत विद्यार्थ्याची कधीही थेट निवड करण्यात येत नाही. पूर्व परीक्षेत असो किंवा अंतिम मुलाखतीत तुम्ही जर अपयशी ठरलात तर तुम्हाला पुन्हा शून्यापासून सुरूवात करावी लागणार हे निश्चित. कधी मुलाखतही पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे पूर्ण करणारा विद्यार्थी पुढच्या वेळी पूर्व परीक्षेत अपयशी ठरल्याचीही उदाहरणं आहेत.
शॉर्टकटवर विश्वास ठेवणार्या, उतावीळ आणि गांभीय नसणार्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा नाही. इथे हवीत यशस्वी होण्याच्या निश्चयासह अभ्यास करणारी मुलं. शिस्तबद्ध पद्धतीने दृढ संकल्प करणारी मुलंच या परीक्षेत उत्तुंग यश मिळवू शकतात अर्थात, देशाला अशाच अधिकार्यांची गरज आहे. आयएएस होऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरले असा विश्वास वाटतो.
Share
