Skip to product information
1 of 1

Maharshi Vitthal Ramaji Shinde : Jeevan Va Karya By G. M. Pawar (महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य )

Maharshi Vitthal Ramaji Shinde : Jeevan Va Karya By G. M. Pawar (महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य )

Regular price Rs. 1,350.00
Regular price Rs. 1,500.00 Sale price Rs. 1,350.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Quantity

“स्वार्थावर लाथ मारून गळ्यात झोळी अडकवून संस्थेकरता - अर्थात आमच्या
लोकांकरिता - संस्थेचे जे चालक भिक्षांदेही करीत दारोदार फिरतात व त्यांना त्यात
कितीही अल्प यश आले तरी ते पर्वा न करता चंदनासारखे स्वत: झिजू दुसर्यांना-
आम्हांला - सुख देण्याकरिता, आमची स्थिती सुधारण्याकरिता आपला प्रयत्न चालू
ठेवतात, त्या संतांची किंमत आजपर्यंत झालेल्या कोणत्याही संतापेक्षा आम्हांला यत्किं
चितही कमी वाटत नाही. कित्येकांना ती जास्त वाटेल.’’
श्री. गणेश आकाजी गवई
डी. सी. मिशनच्या महाराष्ट्र परिषदेत केलेले भाषण, पुणे, 1912

“इतिहास असे सांगतो की, ज्यापासून राष्ट्राचा विकास होतो, अशा सर्व प्रकारच्या
चळवळींचा उगम थोड्याशा व्यक्तींच्या कार्यात सापडतो. प्रस्तुतच्या बाबतीत त्या
व्यक्ती म्हणजे, ज्यांची प्रथम प्रथम हेटाळणी झाली ते डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे
गृहस्थ होत. त्यांच्या कार्याने प्रचंड अशा हिंदू समाजाची सदसद्विवेकबुद्धी जागृत
झाली.’’
न्यायमूर्ती सर नारायणराव चंदावरकर
डी. सी. मिशनची अस्पृश्यतानिवारक परिषद , मुंबई, 1918

View full details