Mahar Vatan Ani Mahatwache Purak Kayade By Pradip patil (महार वतन आणि महत्वाचे पूरक कायदे)
Mahar Vatan Ani Mahatwache Purak Kayade By Pradip patil (महार वतन आणि महत्वाचे पूरक कायदे)
Couldn't load pickup availability
एकविसाव्या शतकामध्येही महार वतन इनामी हक्क जमिनीचे अस्तित्व कायम आहे. सदरील मिळकत महार वतन जमीन असून ही कुठल्याच जी.आर.नुसार किंवा खरेदीद्वारे हस्तांतरण होत नाही. ती फक्त 99 वर्षांच्या करारासह भाडेपट्ट्यावर देता येते. महार वतन जमिनीचे खरेदीखत जरी करून दिले असेल तरी ती जमीन वतनी असल्यामुळे हस्तांतरण होत नाही. मा. सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली व मा. उच्च न्यायालय मुंबई यांच्या मतानुसार एखाद्या चुकीच्या बाबीसाठी मुदतीचा कायदा लागू होत नाही. त्यामुळे सदरील जमिनीवर हक्क असल्यास, खटला दाखल करण्यास उशीर झाला असे म्हणण्याची आवश्यकता नाही. कारण 50 ते 100 वर्षांनंतरही प्रकरण दाखल करता येते आणि ती जमीन महारवतनी मालकाला व वारसाला परत मिळू शकते. या पुस्तकात दिलेली याविषयीची सखोल माहिती माझ्या प्रदीर्घ वकिली व्यवसायाच्या अनुभवातून हाती लागलेली असून वाचकांसाठी ती महत्त्वपूर्ण ठरेल यात शंका नाही.
Share
