Mahant By V. V. Shirwadkar (महंत)
Mahant By V. V. Shirwadkar (महंत)
Couldn't load pickup availability
वि. वा. शिरवाडकरांनी पहिल्यांदाच मुळाबरहुकूम अनुवाद केलेले नाटक ज्याँ आनुई यांचे ‘बेकेट’. परंतु त्यांचा नाटककार म्हणून कल सुरुवातीपासून भारतीय पार्श्वभूमी ठेवून रूपांतराचा. सुरुवातीच्या काळात त्यांनी ऑस्कर वाईल्ड, मॅटरलिंक आणि पुढे शेक्सपीयरच्या नाटकांची या पद्धतीने रूपांतरे केली.
‘बेकेट’ मध्ये माणसातील साधुत्व आणि पशुत्व यांच्यातील संघर्ष आहे, तसाच धर्मसत्ता आणि राजसत्ता यांतीलही. धर्मकल्पना हा विषय प्राचीन भारताच्या पार्श्वभूमीवर विशेषकरून उठून दिसेल ह्या विचाराने शिरवाडकरांनी त्याच विषयावर ‘महंत’ हे नाटक लिहिले.
ह्या विषयाचे आकर्षण इंग्रजीत टी. एस. ईलियटसारख्या थोर लेखकाला वाटले. मराठीतही वसन्त कानेटकर, अरुण होणेकर इत्यादिकांनी निरनिराळ्या पद्धतीने हा विषय मांडला. ‘महंत’मधे शिरवाडकरांनी ‘धर्मसत्तेला’ लोकाभिमुख जनसत्तेचे अधिष्ठान दिले आहे.
मुळात १९८६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या नाटकाची ही शिरवाडकर जन्मशताब्दी विशेष आवृत्ती. संहिता आणि नाट्यप्रयोग यांविषयी लेखक, प्रकाशक आणि नाट्यकर्मी बाळ धुरी आणि रवींद्र मंकणी यांची टिपणे दिली आहेत.
Share
