Krantisury Annabhau Sathe By Vijay Satpute (क्रांतिसूर्य अण्णाभाऊ साठे- विजय सातपुते)
Krantisury Annabhau Sathe By Vijay Satpute (क्रांतिसूर्य अण्णाभाऊ साठे- विजय सातपुते)
Couldn't load pickup availability
लेखकाचे मनोगत
काही लिहायचं झालं, तर लेखनात ओघ असावा, तेज असावं, ओजं असावं, लेखणीत दृष्टी, हस्त, प्रसाद, संयोजन असावा, लेखानात मित्र-मैत्रिणी, सखे, सवंगडी, आप्त इष्ट, नातीगोती, स्नेही, प्रिय व्यक्ती कळत नकळतं प्रेरणा असावी. जीवनाकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी जीवन समीक्षणाची कलाही अवगत असावी आणि असावी ती बद्ध करण्याकरिता उत्कृष्ट लेखन शैली ! वैचारिक प्रभगल्भता, फक्त भरमसाठ अभ्यास, प्रचंड शब्द भांडार, भाषा सौष्ठव व भरपूर एकांत वेळ तथा प्रकृतीची भावनिक, मानसिक, शारीरिक, आर्थिक क्षमताही ! लेखन करताना निष्प्रतिबंध, निःसंकोच, निर्भय प्रामाणिकपणानं लेखणी चालावी. मोकळ्या मनानं अंतःकरणाचे भरपूर विचार, निश्चयात्मक स्वरूपाची चिंतन, सत्य वास्तविकतेचे भान ठेवून घडलेल्या अनुकूल, प्रतिकूल घटना, एखाद्या प्रसंगाविषयी देश, काल, व्यक्ती, परिस्थिती, प्रवृत्ती स्वभावविषयी स्वतःच प्रतिकूल मत वगैरे. जे जे काही आपण सहज जगताना बोलतो करतो ते सर्व लिहिलं जावं. याच भान ठेवून व लेखनाच्या मर्यादा लक्ष्मणरेषा ओलांडली जाणार नाही याची दक्षता घेऊन मी लेखनाच्या यज्ञात उडी घेतली आहे.
आयुष्याच्या उत्तरार्धात स्वतः करिता आणि पुढच्या पिढीकरिता आपण आपलं कुटुंब तथा मित्र परिवार, स्नेही व चोखंदळ वाचक, अभ्यासक, ज्ञानमंदिरे, सार्वजनिक वाचनालये, समाज जीवनाला या माझ्या 'कांतिसूर्य अण्णाभाऊ साठे जीवन चरित्र व कार्य कर्तृत्व' पुस्तकाचा निश्चितच फायदा होईल. असा आशावाद ठेवल्यास वावगे करू नये.
माणसांच्या आयुष्याचा कशाकशाने नाश होतो, यासंबंधी एका विचारवंताने आपले निरीक्षण माडले आहे. तो म्हणतो, 'काहीच आयुष्य अज्ञानाने नष्ट होते, काहींचे आयुष्य आपण स्वतःच केलेल्या चुकांमुळे नष्ट होते आश्चर्य वाटेल, पण वस्तुस्थिती आहे की, काहींचे आयुष्य ज्ञानामुळे (म्हणजे ज्ञानाच्या गर्वामुळे) नष्ट होते. तर काहींचा नाश जे विनाश पावले आहेत, त्यांनी केला आहे.'
Share
