Khandeshi Vahya By Bhalchandra Nemade (खानदेशी वह्या)
Khandeshi Vahya By Bhalchandra Nemade (खानदेशी वह्या)
Couldn't load pickup availability
खानदेशी वह्यांमधले लोकप्रतिभेचे प्राचीन कल्पनाबंध समकालीन ग्रामीण लोकविद्येत दर युगात आंतरिक अनुबंधांमुळे सामावून गेले आहेत. अनेकजिनसी धर्मपंथांची लोकप्रिय तत्त्वे लाक्षणिकरित्या ह्या अशिक्षितांच्या ग्रामीण नेणिवांमधून काव्यात प्रकट होतात. ग्रामसंस्कृतीच्या मर्यादित विश्वसंकल्पनेत भारतीय मिथकांचा आणि दर्शनांचा उमटलेला ठसा भाबड्या प्रतिमारूपकांद्वारे व्यक्त होतो. अनेक देवदेवता, धर्मग्रंथ, प्रेषित, सगळ्या प्रकारच्या जीवनशैलींबद्दल आदर, अनेकवचनी वास्तवज्ञान इत्यादी युरोपी प्रभावापूर्वीचे हे आपल्या लोकगीतांमधले निरक्षरांचे देशी पर्यावरण आधुनिक आंग्लशिक्षित नागरी बुद्धिजीवी प्रतिष्ठित धर्मवृत्तीपेक्षा निश्चितच आदर्श आहे. आपला खरा निर्व्याज शुद्ध हिंदुधर्म ह्या नाना जमातींच्या देशी सृजनशीलतेत आढळतो. प्रस्तुत वह्यांमधील अनेक आध्यात्मिक संदर्भातून तो व्यक्त होतो. मराठी कवितेच्या समृद्ध परंपरेत समाजाच्या पायातले अनाम, कष्टकरी कवी, त्यांचे दर पिढीतले गायक आणि हे उत्स्फूर्त सर्जन जपून ठेवणारे गावगाड्यातले भाबडे रसिक सर्वांनी वसाहतीकरण, आधुनिकीकरण, नागरीकरण आणि आता कोसळलेले जागतिकीकरण ह्या अवस्थांतरांपूर्वी हे चैतन्यशील स्वयंस्फूर्त प्रवाह खळाळत ठेवले होते, ही आपल्या मुळांची देशी समज सर्व कविताप्रेमींना गरजेची आहे. या वह्या त्यासाठीच वाचाव्या. भालचंद्र नेमाडे
Share
