1
/
of
1
Khajinyachi Shodhyatra By Prashant Pol (खजिन्याची शोधयत्रा)
Khajinyachi Shodhyatra By Prashant Pol (खजिन्याची शोधयत्रा)
Regular price
Rs. 276.00
Regular price
Rs. 325.00
Sale price
Rs. 276.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
खजिन्याची शोधयात्रा* हे पुस्तक लिहिताना, त्याची भूमिका, पुस्तकात 'मनोगत' मध्ये मांडली आहे. त्याचे काही अंश -
_‘खजिन्याची शोधयात्रा’ लिहिण्यासाठी अभ्यास करताना वारंवार जाणवत होतं, आपली ज्ञान परंपरा किती समृद्ध आणि संपन्न आहे. आपण त्या काळात उर्वरित जगाच्या खूपच पुढे होतो. अकराव्या - बाराव्या शतकात हे इस्लामी आक्रमक भारतावर चालून आले नसते, तर फक्त भारताचाच नाही, तर जगाचाही इतिहास आणि भूगोल बदलला असता..!_
_अर्थात हे सर्व लिहीत असताना 'जुनं ते सर्व सोनं' किंवा 'फक्त भारतीयांजवळच सर्व ज्ञान होतं' ही भूमिका मी घेतलेली नाही. ती योग्यही नाही. मात्र हे ही सत्य आहे कि काही हजार वर्ष आपला भारत हा जगातील सर्वाधिक समृद्ध, संपन्न आणि ज्ञानवान देश होता._
_भारतात 'भाष्या'ची परंपरा सनातन आहे. त्यामुळे देश-काल-परिस्थिती प्रमाणे परिवर्तन होत राहणार, संकल्पना बदलत राहणार आणि अधिक चांगल्या, अधिक योग्य अशा गोष्टींचा शोध सतत लागत राहणार, यावर आपल्या पूर्वजांची दृढ श्रद्धा होती. आद्य शंकराचार्यांसकट अनेकांनी, जवळपास प्रत्येक विषयावर, भाष्य लिहिली आणि यातून नवनवीन गोष्टी समोर येत गेल्या. उकलत गेल्या. संपूर्ण जगात आपली ज्ञान परंपरा सर्वश्रेष्ठ राहिली, कारण भाष्याच्या रूपानं, प्रत्येक सिद्धांताचं, प्रत्येक संकल्पनेचं, खंडन - मंडन करत पुढे जाणं हा आपला स्थायी भाव राहिला._
_ऋग्वेदाच्या एका सुक्तावर भाष्य लिहून विजयनगर साम्राज्याच्या सायणाचार्यांनी चक्क प्रकाशाचा अचूक वेग काढला तर शंकराचार्यांनी उपनिषदांवर भाष्य लिहून जगण्याच्या मूल्यांना, दैनंदिन व्यवहाराच्या नियमांना आणि व्यवस्थापनाच्या सिद्धांतांना कालसुसंगत रूपात आपल्या समोर ठेवले. न्यायशास्त्रावरील कात्यायन स्मृति, पाराशर स्मृति सारख्या ग्रंथांवर अनेक भाष्य लिहिल्या गेली आणि आपल्या देशात स्थल-काल-परिस्थिती अनुरूप न्यायव्यवस्था विकसित होत गेली
Share
