Khadyavanaspatincha Adbhut Pravas (खाद्यवनस्पतींचा अद्भुत प्रवास)
Khadyavanaspatincha Adbhut Pravas (खाद्यवनस्पतींचा अद्भुत प्रवास)
Couldn't load pickup availability
Khadyavanaspatincha Adbhut Pravas (खाद्यवनस्पतींचा अद्भुत प्रवास)
लेखक - डॉ. मंदार नि. दातार
पाने- २०४
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेवणात नेमके काय असेल? त्यांनी बटाटा, मिरची यांचा
आस्वाद घेतला असेल का? सम्राट चंद्रगुप्तांच्या दरबारात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत
कोणती फळे देऊन केले जात असेल? कालिदासाच्या काळात सणासुदीच्या मेजवानीत
काय पदार्थ असतील? सिंधू संस्कृतीतील लोक काय खात असतील? या प्रश्नाची उत्तरे
आपल्याला इतिहासाची पुस्तके वाचून मिळत नाहीत.
इतिहास म्हणजे केवळ तलवारींचा खणखणाट आणि तोफांचा दणदणाट नसतो. जगाचा
सगळा इतिहास हा खरे तर खाद्य वनस्पतींचाच इतिहास आहे. सम्राट अलेक्झांडरच्या
स्वारीनंतर जगाला अनेक उपयुक्त भारतीय वनस्पतींचा परिचय झाला. चहाच्या अन्
अफूच्या व्यापारामुळेच इंग्रजांची चीनशी युद्धे झाली. भारतातून होणारा मसाल्यांचा
व्यापार ताब्यात ठेवण्यासाठी झालेल्या युरोपियन राष्ट्रांच्या स्पर्धेमुळे जगातील अनेक
प्रांतांना गुलामगिरीचे जोखड गळ्यात अडकवून घ्यावे लागले. कोलंबसच्या अमेरिकेला
पोचण्यातून अनेक नव्या वनस्पती जगभरातील खवय्यांच्या पानात दाखल झाल्या.
बोस्टन टी पार्टीने अमेरिकन क्रांतीची ठिणगी पेटवली. बांदा बेटांवरची दुर्दैवी कत्तल
असो किंवा आयर्लंडमधला बटाट्याचा दुष्काळ असो की कॉफी हाऊसेसने युरोपमध्ये
केलेली वैचारिक क्रांती असो, या आणि अशा अनेक जागतिक महत्त्वाच्या घटना खाद्य
वनस्पतींशीच संबंधित आहेत.
तेव्हा आज आपल्या ताटात पडणाऱ्या या अशा देशोदेशीच्या फळांचा, भाज्यांचा, धान्यांचा,
मसाल्यांचा आणि त्यांच्या इतिहास-भूगोलाचा हा एक अद्भुत गोष्टीरूपातला परिचय.
Khadyavanaspatincha Adbhut Pravas | Dr. Mandar N.Datar
खाद्यवनस्पतींचा अद्भुत प्रवास । डॉ. मंदार नि. दातार
Share
