Kapus Lagwad By Diliprao Deshmukh Baradkar (कापूस लागवड )
Kapus Lagwad By Diliprao Deshmukh Baradkar (कापूस लागवड )
Couldn't load pickup availability
कापूस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक आहे. शेतकरी प्रचलित १६ सेंद्रिय शेती पद्धतीने कापूस लागवड करतात. परंतु त्यांना समाधानकारक उत्पन्न मिळत नाही. कृषी विद्यापीठांनी मृदा-विज्ञान (Soil Science), पीक विज्ञानाच्या (Crop Science) आधारावर कापसासह सर्व पिकांच्या लागवडपद्धती दिल्या आहेत. परंतु पुस्तकात शास्त्रज्ञांनी दुर्लक्षित केलेल्या जगातील ७०पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी अवलंबलेल्या बायोडायनामिक विज्ञानाचा समावेश करत 'इसाप' (ISAP-Integrated Sustainable Agricultural Practices) 'एकात्मिक शाश्वत शेती तंत्रज्ञान' दिले आहे.
कापसासाठी जमिनीच्या पूर्व-मशागतीपासून, वाणाची निवड, बीटी कापूस का नको, पेरणी पद्धत, बियाणे संस्कार, योग्य आंतरपिके, त्याचे पीकपोषण, पिकसंरक्षण, तण व्यवस्थापन, वेचणी या कामांचा तपशील व त्याचे बायोडायनामिक (बी.डी.) कॅलेंडरप्रमाणे वेळापत्रक, संपर्क पत्ते यांचा समावेश पुस्तकात केला आहे.
शेतकरी, शेती अभ्यासक, विद्यार्थी, सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते यांच्यासाठी 'कापूस लागवड' उपयुक्त पुस्तक आहे.
Share
