Kanchanbari By Nitin Thorat (कांचनबारी नितीन थोरात)
Kanchanbari By Nitin Thorat (कांचनबारी नितीन थोरात)
Couldn't load pickup availability
इतिहासाची पाने रक्तबंबाळ करणारी युद्धकांदबरी - #कांचनबारी
लेखक - नितीन अरुण थोरात
मुखपृष्ट - प्रमोद कल्लाप्पा मोर्ती
🚩नाशिकजवळच्या चांदवड तालुक्यात आहे कांचना किल्ला. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली खिंड म्हणजे कांचनबारी अन् या खिंडीत झालेली लढाई म्हणजेच कांचनबारीची लढाई.
🚩शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतेवर छापा टाकला. राजे कोटभर रूपयांचा खजाना घेऊन राजगडाकडं निघाले. पण, दाऊदखान कुरेशी हा कडवा मुघली सरदार हजारोंच्या फौजेसह कांचनबारीत येऊन उभा राहिला आणि सुरू झाले इतिहासाची पाने रक्तबंबाळ करणारे घनघोर युदध.
ते युद्ध म्हणजेच कांचनबारीचे युद्ध.
🚩दसऱ्याच्या शौर्यमुहूर्तावर कांचनबारी या कादंबरीचे मुखपृष्ट तुमच्यासमोर मांडताना मनापासून आनंद होतो आहे.
महत्त्वाचे म्हणजे, आज २ तारीख आणि बरोबर पंधरा दिवसांनी म्हणजेच १७ ऑक्टोबर रोजी या युद्धाला ३५५ वर्षे पूर्ण होत आहेत. या तारखेच्या आत प्रत्येक शिवप्रेमीच्या घरात ही कादंबरी पोहचावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
Share
