Kam Tamam @ Wagha Border By Satish Tambe (काम तमाम @ वाघा बॉर्डर)
Kam Tamam @ Wagha Border By Satish Tambe (काम तमाम @ वाघा बॉर्डर)
Couldn't load pickup availability
या कथा आपल्याला थेट भिडतात याचे कारणच मुळी त्या आपल्या परिचित परिसरातल्या आहेत. परंतु त्या परिचित वास्तवाला अनपेक्षित छेद देऊन आपल्याला काहीशा गूढ आणि काहीशा रहस्यमय अवास्तवाकडे घेऊन जातात. वाचताना धक्का बसतो, भीतीही वाटते आणि म्हणून उत्कंठाही वाढते. सतत कुठेतरी जाणवत राहते की या ‘अवास्तव वास्तवाला’ आणि त्यातील क्रौर्याला तसेच करुणेला आपल्या मनात खोल स्थान आहे… संशयाने आणि भीतीने, अनिश्चिततेने आणि अस्वस्थतेने आपले दैनंदिन जीवन कसे वेढलेले आहे हे या सर्व कथांमध्ये ठसठसत जाणवत राहते.
कुमार केतकर (प्रस्तावनेतून)
मराठी कथा-साहित्यात सतीश तांबे यांच्या कथेचं स्वतंत्र स्वयंभू घराणं आहे. त्याला महानगरी कथेच्या कोंदणात कोंबू नये. तिचं वळण बौद्धिक आहे. शैली ऐसपैस गजाली सांगणाऱ्या गोष्टींची आहे. तिचं अनुकरण सोपं नाही, कारण ती विशिष्ट विचार प्रक्रियेतून प्रसवलेली असते
Share
