Kalokhatil Kalokh By Mahadev More (महादेव मोरे)
Kalokhatil Kalokh By Mahadev More (महादेव मोरे)
Couldn't load pickup availability
`काळोखातील काळोख` या दीर्घ कथासंग्रहातील ग्रामीण भाग, त्यांची राहणी आणि त्यातील भयावह वाटावेत असे प्रसंग शहरी लोकांच्या अंगावर काटा आणणारे आहेत. घडी घडीला चांगल्या-वाईट प्रकाराचे आश्चर्य वाचनातून अनुभवताना एकच विचार येतो की, जर हे सत्यात घडलं अथवा घडत असेल तर, त्या भागातील मानवजातिच्या संवेदनांचं काय होत असेल? या संग्रहात एक ‘चक्रव्यूह’ असतो.. पैसा आणि स्त्री-वासना असते.. शाळेतील मास्तर संस्कारांची उधळण करतो; पण त्याचा बळी जातो. संस्कारांचा `काळोखातील काळोख’ आपल्याला बघायला मिळतो तो स्त्रीयांच्या धंद्यातील चढाओढीत.. स्वत:चा पदर पाडणं आणि दुसर्यांना पाडायला शिकवणं यात प्रत्येक जण धंद्याच्या काळोखात खोल खोल जातो. वैचारिक ज्ञानाची `येल’ सगळीकडे खुंटलेलीच दिसते. ‘दलित’ ही फक्त एक जात? नाही ते एक शाब्दिक शस्त्र आहे व व्यापारी आणि दलित यांच्यातील वादात स्वत:चाही आर्थिक फायदा करून घेणारे गुरुजी हे नावाचे गुरुजी आहेत हेच बरं आहे... चला वाचू या..!
Share
