Jivan Zara By Jayant Ayachit (जयंत आयाचित)
Jivan Zara By Jayant Ayachit (जयंत आयाचित)
Couldn't load pickup availability
पाने १०७
कवीचे मनोगत...... मला शालेय जीवनापासून (इयत्ता १०वी) जी कविता सुचली ती मी माझ्या वहीत लिहून ठेवली. अनेक प्रसंग, जीवनातील चढ-उतार याचे प्रतिबिंब त्यात पडले आहे. जीवन हा एक प्रवाह आहे. त्याला वाहते ठेवणारा काव्य हा एक निर्झर आहे. किंवा जर जीवन हा प्रवास मानला तर कविता हा नवसंजीवन देणारा विसावा आहे. त्यात वृक्षाची गार सावली, फुलांचा सुगंध आणि झऱ्याचे निर्मळ पाणी असा त्रिवेणी योग आहे. माझ्या कवितांचा 'जीवन-झरा' म्हणून काव्य संग्रह प्रकाशित करताना मला आनंद होतो आहे. कविची पदवी नसते, कवि बनविता येत नाही. तो जन्मावा लागतो. निसर्ग, कविमनाची माणसं, ग्रंथ आणि उपजत जिज्ञासा यातून तो घडत जातो. संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे 'वाचे बरवे कवित्व । कवित्वी बरवे रसिकत्व । रसिकत्वी परतत्व । स्पर्श जैसा ।। ज्याला काव्याची आवड निर्माण होते त्याला जगण्याचा अर्थ कळून येतो किंवा त्याला जीवनी रस मिळतो. वेळोवेळी, प्रसंगानुरूप मला जी कविता सुचली ती मी लिहीत गेलो. प्रेमाला प्रतिसाद मिळाल्याने प्रेम वाढीस लागते तशी माझी कवितेची रूची वाढत गेली व त्यातून हा काव्यसंग्रह जन्मास आला. कविची वेदना रसिक, कविमनाची माणसंच जाणतात. मला आशा आहे आपण सर्व माझ्या सुखदुःखाशी समरस व्हाल. यांतील सर्व कविता मराठीत आहेत. फक्त तीन कविता हिंदीत आहेत. कवितेला प्रगट होण्यास शब्दाचा, भाषेचा आधार लागतो. कवित्व हे आकाशाप्रमाणे अनंत आणि अथांग आहे. कवि हा सृष्टीचा निर्माता आणि शब्दब्रह्माचा उपासक आहे. त्याच्या मनातील प्रतिभेच्या संवेदनेतून जन्माला आलेली कविता ही एक विपश्यना आहे. जीवनसत्याचे एक नवे दर्शन, नवा साक्षात्कार कवितेला नेहमी स्त्री ची उपमा दिली जाते. कारण ती प्रसवणारी आहे. नवजीवनाचे अनेक अंकुर त्यात लपले आहेत. शेतकरी हा बीज पेरतो पण त्यातून धान्य वा वृक्ष निर्माण करण्याचे काम भूमीमाताच करते. म्हणून मी शेवटी 'या देवी सर्वभूतेषु काव्यंरूपेण संस्थिता, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमो नमः ।। शारदा देवीला, तिच्या मातृरुपाला वंदन करतो.
Share
