Jatisanstheche Ucchatan | Dr. Babasaheb Ambedkar Anuwad | Vasant Moon (जातिसंस्थेचे उच्चाटन । डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुवाद : वसंत मून)
Jatisanstheche Ucchatan | Dr. Babasaheb Ambedkar Anuwad | Vasant Moon (जातिसंस्थेचे उच्चाटन । डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुवाद : वसंत मून)
Couldn't load pickup availability
जातिसंस्थेचे उच्चाटन । डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुवाद
चातुर्वर्ण्य आणि जातिव्यवस्था याविरुद्ध डागलेली सर्वांत प्रभावी तोफ,
असे वर्णन डॉ. आंबेडकरांच्या या प्रबंधाचे करता येईल. डॉ. आंबेडकरांच्या
एकंदर समाजकारणात आणि राजकारणात या प्रबंधाचे स्थान मध्यवर्ती
आहे. या प्रबंधाच्या एका महत्त्वाच्या वैशिष्ट्याकडे लक्ष वेधणे आवश्यक
आहे. जातिव्यवस्थेत कनिष्ठ जातींवर अन्याय झाला; पण डॉ. आंबेडकर
केवळ आपल्यावरील अन्याय वेशीवर टांगत नाहीत. जातिव्यवस्थेमुळे
संपूर्ण हिंदू समाजाचेच विघटन कसे झाले आणि वारंवार पराभव कसे
पत्करावे लागले, यावर तितकाच भर देतात. डॉ. आंबेडकरांची दृष्टी अत्यंत
व्यापक होती. जातिव्यवस्थेचे हलाहल त्यांना प्राशन करावे लागले. पण
तरीही ते संपूर्ण हिंदू समाजाच्या हानीची कारणमीमांसा मांडतात. हलाहल
कंठात धारण करून ज्यांच्यामुळे हा जुलूम सहन करावा लागला, त्यांनाही
हिताचा मार्ग दाखवतात.
Share
