Janubhau By S. L. Khutwad (जनुभाऊ)
Janubhau By S. L. Khutwad (जनुभाऊ)
Couldn't load pickup availability
तिरसट स्वभाव व स्पष्टवक्तेपणा यांचा मिलाफ म्हणजे ‘जनूभाऊ.’ `मोडेन पण वाकणार नाही,` असा स्वभाव असणारे, आपले म्हणणे पटवून देताना हुज्जत घालत समोरच्याला शिंगावर घेणारे, सत्यावर विश्वास ठेवून, तत्त्वनिष्ठेने जगणारे, समोरच्याचा किमान शब्दांत कमाल अपमान करण्यात हातखंडा असणारे, माणुसकी जपून आपुलकीचं दर्शन घडवणारे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे अस्सल पुणेकर असल्याकारणाने पुण्याविषयीचा जाज्वल्य अभिमान बाळगणारे; तसेच सरकारी कार्यालये, बँका, पोलीस खाते, दुकाने, पीएमटी बस, रिक्षा, सार्वजनिक ठिकाणे, गणेशोत्सव इ. ठिकाणी शाब्दिक प्रहार करून व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करणारे, मुद्देसुद कसं बोलावं, कसं भांडावं, निवडणूक प्रचारातील कार्यकर्त्यांना कसं सामोरं जावं, आपलाच मुद्दा बरोबर आहे हे निश्चयानं समोरच्याला कसं सांगत राहावं आणि दुपारची झोप ही महत्त्वाचीच असते हे झोपमोड करणार्याला खेकसून कसं सांगावं या प्रत्येक गोष्टीवर मत मांडण्याची खुमखुमी असणार्या ‘जनूभाऊं’चे अजब व्यक्तिमत्त्व!