Skip to product information
1 of 1

Ithe Granthachiye Nagari By Vitthal Ray Bhat (इथे ग्रंथाचिये नगरी - विठ्ठल रायभट )

Ithe Granthachiye Nagari By Vitthal Ray Bhat (इथे ग्रंथाचिये नगरी - विठ्ठल रायभट )

Regular price Rs. 100.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 100.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language Version
Quantity

मी निर्मितिक्षम, सकारात्मक वृत्तीचा माणूस आहे. सतत काही ना काही करत राहणे हा माझा स्थायिभाव आहे. त्यात वाचन, मनन, चिंतन तसेच लेखन पण आले. शिवाय पत्रे व फोनद्वारा सतत नातलग, मित्र, वाचक, प्रकाशक यांच्याशी संपर्क साधत असतो. मराठी, कोंकणी व इंग्रजीत मिळून माझी शंभराच्यावर पुस्तके प्रकाशित झाली. अनेकदा वाचकांची नाना प्रश्न विचारणारी पत्रे येत असतात. त्यात "तुम्हाला लेखक व्हावेस का वाटले ? प्रकाशक व वितरक म्हणून तुम्हाला कोणते अनुभव आले ? साहित्यविश्वातील लोकांचे कोणते अनुभव आले?" असे प्रश्न पण असतात. "चित्रकार, मुद्रक यांना कसे गाठले ?' मेला लेखक व्हायचं आहे त्याबद्दल मार्गदर्शन कराल?" किती प्रश्न ! सर्वात जास्त प्रश्न म्हणजे "तुम्हाला अमुक पुस्तक लिहावेसे का वाटले ?" हा असतो. वरील सर्व गोष्टींचा विचार करून व वाचकांचे कुतूहल व उत्सुकता लक्षात घेवून मी 'पुस्तकामागचे पुस्तक' या नावाने माझ्या एकूण साहित्यक्षेत्रातील कामाचा धांडोळा घ्यावा असे ठरविले. पुस्तकाचा कच्चा आराखडा तयार केला, तेवढ्यात पुण्याच्या एका प्रकाशिकेने (शशिकला उपाध्ये) यांनी त्याच नावाचे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे अस समजले. म्हणून मी शीर्षक बदलून "इये ग्रंथांचिये नगरी" असे नवे नामकरण केले. या अगोदर मी 'नोकरमामा' व 'जांबावली ते आंबीवली' अशी आत्मचरित्रात्मक अंश असलेली दोन पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्याच साखळीतील हे तिसरे पुष्प आहे, अजूनपर्यंत मी प्रकाशित केलेल्या पृष्ठांची संख्या साधारण दहाहजार आहे. वेगवेगळ्या प्रकाशकांकडे पडून असलेल्या हस्तलिखितांची पाने साधारण आठहजार असावीत. Authors Guild of India या लेखक संघटनेच्या अंदाजानुसार माझा साधारण १४ लाख एवढा वाचक वर्ग आहे. हे पुस्तक लिहिताना मला पुनः प्रत्ययाचा आनंद लाभला.

पाने 112

View full details