Skip to product information
1 of 1

Indhan (Abridged Edition) – Hamid Dalwai (इंधन (संक्षिप्त आवृत्ती) - हमीद दलवाई )

Indhan (Abridged Edition) – Hamid Dalwai (इंधन (संक्षिप्त आवृत्ती) - हमीद दलवाई )

Regular price Rs. 85.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 85.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

जवळपास पंधरा वर्षांनी आपल्या कोकणातल्या वतनाकडे आलेला हा प्रवासी म्हणजे स्वतः लेखकच आहे. त्याला आलेल्या हार्टअॅटॅकनंतर हवापालटासाठी आणि ताणरहित जगण्यासाठी तो इथे आला आहे.

लेखक पुरोगामी विचारांचा, मुस्लीम आहे. त्याने सारी धार्मिक कवचं झुगारून दिलेली आहेत. त्यासाठी त्यांना आपली वतनवाडी सोडून मुंबईसारख्या महानगरात दाखल व्हावे लागले.

कारण अरूंद परिघात सनातन्यांच्या फळ्या पाडणे केवळ अवघडच नव्हे तर अशक्य झाले असते. त्यासाठी आपल्या कुटुंबापासून दूर जावे लागल्याचा सल त्यांच्या मनात आहे. तो अनेक घटना, प्रसंगातून प्रतीत होत राहातो.

सुरुवातीच्या काळात तो गावातल्या घटनांकडे तटस्थपणे पाहतो. पण जसजशी गावातल्या राजकारणात तीव्रता यायला लागते, राजकारण टोकदारपणाकडे सरकू लागते, तसतसा त्याच्यातला मानव जागा होतो आणि त्याच्यातल्या पुढारीपणाला नकळत साद घालू लागतो.

View full details