Hundaka By Prabhakar Jadhav (हुंदका)
Hundaka By Prabhakar Jadhav (हुंदका)
Couldn't load pickup availability
हुंदका अर्थात रडण्याचा उमाळा... वेदनेचा सर्वोच्च बिंदू ! हा हुंदका आर्थिक, कौटुंबिक, नैतिक, सामाजिक, न्यायिक प्रकारचा असून तो राष्ट्रीय पातळी गाठून आंतरराष्ट्रीय पातळीकडे कधी मजल मारतो हे लक्षातही येत नाही. हा हुंदका प्रभाकर जाधव यांनी मोठ्या ताकदीने जगासमोर आणलेला आहे. 'हुंदका' ही कादंबरी ग्रामीण बोलीभाषेतील आहे. या कादंबरीत ग्रामीण शब्द सौंदर्य, चित्रस्थ सौंदर्य, भाव सौंदर्य, भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य, व्यक्ती सौंदर्य आणि अभिव्यक्ती सौंदर्य जागोजागी दिसून येतात. तसेच विविध रसांचा परिपाक या कादंबरीत दिसून येतो. विशेषतः करुण रस आणि बीभत्स रस यामध्ये ठासून भरलेला आहे. या कादंबरीतील मुख्य नायिका झिंगी असून नायक चिंदक्या तर खलनायक खंड्या आहे. खंड्या अर्थात खंडणी वसूल करणारा! हा व्यसनाधीन असून दारुच्या नशेत तो नशेच्या पुर्तीसाठी स्वतःच्या वडिलांचा देखील बळी घेतो. सख्खी पुतनी झिंगी हिच्यावर अत्याचार करुन पाप उघडकीस येऊ नये म्हणून तिलाही संपवतो. एक दोन, नाही तर तब्बल चार चार खून करूनही गावासमोर एक आदर्श व्यक्ती ठरतो. ही कादंबरी वाचतांना दगडालाही पाझर फुटावा असे भाष्य यात दिसून येते. झिंगीची आई केवळाबाईची अगतिकता मनाला व्याकूळ करणारी आहे. म्हाताऱ्या भिवराबाईचा संसार हाकण्यासाठीचा नि पती गिरजाजीला जिवंत ठेवण्यासाठीचा संघर्ष हृदयस्पर्शी आहे. गिरजाजीची जगण्यासाठीची निरर्थक धडपड मनाला चटका लावणारी आहे. या कलाकृतीचा शेवट होत असतानाच ही कलाकृती भविष्याचा वेध घेत भावी मोठ्या वादळाची जन्मदात्रीच ठरू पाहते. ही कलाकृती त्रिकालबाधित सत्यावर आधारित असल्यामुळे ही कलाकृती चिरंजीवी आहे. असंच सकस साहित्य माझ्या बाळाहातून घडो ! या शुभेच्छांसह अनेक आशिर्वाद ! डॉ. विजया वाड सुप्रसिध्द साहित्यिका तथा मा. अध्यक्षा मराठी विश्वकोश मंडळ, मुंबई