Skip to product information
1 of 2

Hindusthanachya Suvarnbhumit Portugijanche Aagman V Asta By Krushna Shetkar (हिंदुस्थानच्या सुवर्णभूमीत पोर्तुगीजांचे आगमन व अस्त - कृष्णा )

Hindusthanachya Suvarnbhumit Portugijanche Aagman V Asta By Krushna Shetkar (हिंदुस्थानच्या सुवर्णभूमीत पोर्तुगीजांचे आगमन व अस्त - कृष्णा )

Regular price Rs. 100.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 100.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language version
Quantity

पर्वरी येथील एक मान्यवर, माजी नौसैनिक, लेखक श्री. कृष्णा महादेव शेटकर यांच्या पोर्तुगिजांचे आगमन व अस्त पुस्तकासाठी प्रस्तावना एक आढावा लिहिण्याची संधी मिळाल्यामुळे धन्य वाटले.

काही वर्षांपूर्वी पेन्ह-द-फ्रांक ग्रामपंचायतीने आमच्या पर्वरी भागात एक वाचनालय सुरू केले. हल्ली प्रत्येक शाळेला जसा पालक-शिक्षक संघ असतो, त्याचप्रमाणे वाचनालयाला 'वाचक सल्लागार समिती' असते. या समितीने सार्वजनिक वाचनालये विधायक पद्धतीने चालवावी अशी अपेक्षा असते. सुदैवाने आमच्या पंचायत वाचनालयाला त्याकाळी असा विधायक कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा कार्यतत्पर संच मिळाला होता. त्यातूनच स्वतःचे कार्यानुभव कथन करण्याच्या एका पाक्षिक कार्यक्रमाची आणखी झाली होती. त्या कार्यक्रमात एक अनुभवी नौसैनिक, लेखक श्री. शेटकर यांचे दर्शन झाले. पुढे गोमंतकातील विविध वृत्तपत्रांतून त्याचे नौसैनिकी जीवनावरील बरेच लेख प्रसिद्ध झाले. या साहित्य प्रवासातूनच त्यांच्या नौसैनिकाच्या डायरीतून, नौसैनिकाची डायरी, सदैव सैनिका व स्मृतितरंग या चार पुस्तकांची निर्मिती झाली.

आता श्री. शेटकर यांचे हिंदुस्थान सुवर्ण भूमीत पोर्तुगिजांचे आगमन व अस्त हे पुस्तक वाचकांच्या हाती पडत आहे. त्यांत त्यांनी पोर्तुगिजांच्या भारतातील तसेच गोव्यातील आगनापासून गोवा मुक्तीपर्यंतचा इतिहास ओघवत्या भाषेत किशोर वयीन मुलांना दृष्टीसमोर ठेवून कथन केला आहे. आजच्या गोमंतकीय युवा पिढीचा विचार केल्यास ही एक फार मोठी गरजच होती.

आज गोव्यातील युवा पिढीला गोवा मुक्तीचा इतिहास मुळीच ज्ञात नाही असे दिसते. याला कारण शालेय अभ्यासक्रमांत या संग्रामाला अगदी अत्यल्प असे स्थान दिाले आहे. पाने 80

View full details