Skip to product information
1 of 1

Hidden Potential By Adam Grant, Jayant Gune(Translator) (हिडन पोटॅन्शिअल)

Hidden Potential By Adam Grant, Jayant Gune(Translator) (हिडन पोटॅन्शिअल)

Regular price Rs. 297.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 297.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

स्वतःची कामगिरी उंचावण्यासाठी काय करायचं आणि इतरांनाही त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी कसे सहाय्य करता येईल ते अॅडम ग्रँट यांनी हिडन पोटॅन्शिअल या पुस्तकात सोदाहरण समजावून सांगीतलेलं आहे.

आपण ज्या जगात राहतो त्यात बुद्धीमान आणि गुणवंत जागोजागी आढळतात. शाळेत लहानपणी चमकणारी हुशार मुलं, नैसर्गिक गुणवत्ता असलेले खेळाडू, लहान वयात संगीतात असामान्य प्रतिभा असलेली मुलं, यांचं आपण कौतुक करतो. पण नैसर्गिक गुणवत्ता अंगी असलेल्यांच्या यशाने भारावून गेल्यामुळे आपल्यामध्ये किती मोठी मजल मारण्याची क्षमता आहे याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. सुरुवात कोठूनही केलेली असली तरी त्यात सुधारणा करता येते. सुधारणा करण्याची संधी आपल्याकडे चालत आली नाही तर आपण आपल्यासाठी संधी निर्माण करू शकतो.

आपल्या आकांक्षांना अपेक्षांचं कुंपण घालून घेता कामा नये. कारण अपेक्षांना ओलांडून जाण्याची कुवत सर्वांमध्ये असते. पण ती क्षमता ओळखून सर्वोच्च कामगिरी करण्यासाठी काय करावं लागेल याच्यावर त्यांनी मूलभूत संशोधन केलं. त्यासाठी त्यांनी नव्या गृहीतांची मांडणी केली. त्यांनी पुराव्यासाठी पुस्तकात खऱ्या जगातील यशस्वी उदारणे दिली आहेत. अॅडम ग्रँट यांचं वैशिष्ट्यं म्हणजे त्यांची कथनशैली रसपूर्ण आहे. त्यामुळे गंभीर विषयावरील पुस्तकाच्या वाचनीयतेत वाढ झाली आहे. त्यांच्या विषयांचा संचार शाळेतील वर्गापासून कंपनीच्या बोर्डरूमपर्यंत, खेळाच्या मैदानावरून ऑलिंपिक पदकांपर्यंत, भूमिगत खाणींतल्या कामगारांपासून ते अंतराळवीरांपर्यंत सर्वत्र फिरत असतो. तुमची प्रगती तुम्ही किती कठोर परिश्रम घेतले आहेत यापेक्षा काय शिकला आहात यावर जास्त अवलंबून असते हे ते सोदाहरण दाखवून देतात. या प्रवासात तुमच्या स्वभाववैशिष्ट्यांची घडण ही सर्वात जास्त महत्वाची असते. स्वभाववैशिष्ट्ये आणि कौशल्ये कशी विकसित करता येतात यांचं सुरेख मार्गदर्शन ग्रँट आपल्या पुस्तकात करतात. त्यासाठी लागणारी प्रेरकशक्ती कशी निर्माण करता येईल त्याचा उहापोह त्यांनी केला आहे. ज्यांना कोणीही जमेस धरत नाही अशा वंचितांसाठी संधी कशा निर्माण करायच्या याचं सुस्पष्ट मार्गदर्शन त्यांच्या पुस्तकातून मिळतं.

या पुस्तकात प्रत्येक व्यक्तिला स्वतःमध्ये लपलेल्या सुप्त क्षमता कशा ओळखव्यात आणि त्यांच्या योगे आकाशाला गवसणी कशी घालावी याचा मार्ग दाखवला आहे

View full details