Harishchandra By Minakshi Patole (हरिश्चंद्र)
Harishchandra By Minakshi Patole (हरिश्चंद्र)
अयोध्येचा राजा हरिश्चंद्र यांच्या जीवनावर ही कादंबरी आधारित आहे. ज्येष्ठ समीक्षक माननीय श्रीपाल सबनीस सर यांची या कादंबरीला प्रस्तावना लाभलेली आहे. 'तारामती' 'हरिश्चंद्र' आणि 'विश्वमित्र' हे या कादंबरीतील मुख्य पात्र आहेत. या पात्रांचे स्वगत लेखिकेने लिहिले आहे. मूळ कथेतील कल्पनाविलास या कादंबरीमध्ये टाळून वास्तविक जीवनाशी कशी साधर्म्य साधेल याचा लेखकाने प्रयत्न केला आहे. तारामती आणि हरिश्चंद्र यांच्या आयुष्यात आलेल्या संकटांशी ते धाडसाने सामना करतात. संकटातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. सामान्य माणसाच्या आयुष्यातही येणाऱ्या संकटांचा सकारात्मक पद्धतीने कसा सामना करावा निराश न होता प्रत्येक अडचणी कडे सकारात्मकतेने कसे बघावे हा संदेश ही कादंबरी देते. ही कादंबरी आशावाद आणि सकारात्मकता अधोरेखित करते. सर्वांच्या संग्रही असावी अशीच ही कादंबरी आहे.