Happiness Happens By Robin Singh, Rohit Walimbe(Translator) (हॅपिनेस हॅपन्स )
Happiness Happens By Robin Singh, Rohit Walimbe(Translator) (हॅपिनेस हॅपन्स )
Couldn't load pickup availability
आयुष्य म्हणजे नेमकं काय किंवा त्याच्या अस्तित्वामागचे कारण काय? हे लेखक रॉबिन सिंग तुम्हाला सांगू शकणार नाही... पण कशासाठी जगायचे आणि कसे जगायचे? याचे नेमकं उत्तर मात्र तुम्हाला ‘हॅपिनेस हॅपन्स’ हे त्यांचे पुस्तक नक्की देईल.
हे पुस्तक का वाचले पाहिजे; याविषयी लेखक रॉबिन सिंग म्हणतात;
तुम्ही जर दुःखी असाल, विमनस्क असाल किंवा तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील
तुम्ही तुमचे काम चांगल्या पद्धतीने करत असाल किंवा करू इच्छित असाल आणि त्यासाठी तुम्हाला अजून मार्गदर्शनाची गरज असेल.
तुम्ही हे पुस्तक न वाचता, सोशल मीडियावर येणाऱ्या ‘न्यूज फीड’ पाहण्यातच वेळ घालवत असाल
हे पुस्तक म्हणजे, रॉबिन सिंग यांनी त्यांची ‘टेक’ कंपनी सोडून ‘पीपल फार्म’ हे प्राणी बचाव केंद्र सुरू करण्यापर्यंतच्या त्यांच्या रोमांचक प्रवासाचे वर्णन आहे. या प्रवासात त्यांना जी उत्तरं मिळाली आणि ही उत्तरं मिळवण्यासाठी त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले; त्या सर्वांचा समावेश या पुस्तकात आहे.
Share
