Skip to product information
1 of 1

Halka Phulka By Dr. Kamlesh Soman (हलकं फुलकं)

Halka Phulka By Dr. Kamlesh Soman (हलकं फुलकं)

Regular price Rs. 191.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 191.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

शहाणपणाच्या ३१ हलक्या फुलक्या गोष्टी.

जीवन वैभवाचे रहस्य काळजीपूर्वक उलगडून दाखवणारे हे एक शहाणे पुस्तक आहे. यातील लहानमोठ्या गोष्टी-विचार-जीवनभाष्ये मोठ्या मित्रत्वाने व आपुलकीने आपल्याशी हितगूज करतील. आंतरिक क्षमतेचा विनियोग, संघर्षाविना कृतीशील सामंजस्याचे जीवन जगणे ही नेहमीच शहाणपणाची कृती असते. समग्र जीवनाचे अवलोकन करीत जन्मजात बुद्धिला परिपक्व व अधिकाधिक प्रगल्भ करणारे हे बोधसाहित्य आहे. यात नानाविध किस्से, विचारमौक्तिके, आगळ्या-वेगळ्या घटना-प्रसंग, योग्य विचार-योग्य कृती करण्याची दिशा व दृष्टी, चिंतनाला प्रेरित करणाऱ्या छोट्या-मोठ्या बोधकथा तसेच अलौकिक अनुभवसंपन्न शहाणपणाचे उद्गार, विनोद... अशा अनेक गोष्टी यात आहेत. जीवन जगण्याच्या कलेतील सखोलता आणि समृद्धता यासह प्रत्यक्ष जगणे टिपण्याचा प्रयत्न प्रस्तुत ग्रंथात केला आहे. रोज एक या प्रमाणे प्रत्येक दिवशी महिनाभर या शहाणपणाच्या गोष्टींवर विचार करा. अर्थात ही केवळ सूत्रे वा सिद्धांत नसून प्रत्यक्ष जगण्यासंबंधीचे हे सहज-चिंतन आहे.

मी एक कलावंत-शिक्षक असून माझे काम तुम्हाला जागे करण्याचे आहे. आपण हे करू शकतो, यावर ज्यांचा विश्वास आहे, जे सौंदर्यपूर्ण आयुष्याचे स्वप्न पाहतात आणि जे प्रेरित होऊन तत्काळ कृती करतात आणि मोठ्या सृजनशीलतेने जगतात, अशांचा मी आदर करतो आणि त्यांना सॅल्यूट ठोकतो. अशा लोकांना जीवनवैभवाचे रहस्य प्रतिपादन करणारे हे पुस्तक निश्चितपणे सहाय्यभूत ठरणार आहे, यात मला तीळमात्र शंका वाटत नाही. आजवरच्या पस्तीस वर्षांच्या साहित्य-कला प्रवासात जे आकलनातील वैभव प्राप्त झाले, ते संकलित व संपादित स्वरुपात, आपल्या तळहातावर ठेवण्याचा हा एक नम्म्र प्रयत्न आहे. तुम्हाला हे निश्चित आवडेल !

View full details