Guruvarya Krushnarao Arjun Keluskar Atmacharitra Va Charitra ( गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर आत्मचरित्र व चरित्र)
Guruvarya Krushnarao Arjun Keluskar Atmacharitra Va Charitra ( गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर आत्मचरित्र व चरित्र)
Couldn't load pickup availability
म. फुले, राजर्षी शाहू, महर्षी शिंदे आणि डॉ. आंबेडकर या कर्त्या युगपुरुषांना सर्वार्थाने साहाय्य करणारे, पाठबळ देणारे महाराजा सयाजीराव गायकवाड होते, पुरोगामी महाराष्ट्र आता समजून घेत आहे; तसेच गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर हेही त्या कालखंडातील एक मोठे विचारवंत, विख्यात चरित्रकार, विवेकवादी वक्ते, इतिहासकार, सामाजिक नेते आणि कामगारांचे कैवारी होते.
राजकीय ऋषी मामा परमानंद, न्यायमूर्ती रानडे या विचारवंतांनी त्यांच्या लेखणीची व विचारांची प्रशंसा केली. त्यांनी पस्तीस चरित्रे लिहिली. गौतम बुद्ध, संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी या युगपुरुषांचे ते मराठीतील पहिले महान चरित्रकार आहेत.
गुरुवर्य केळूसकर गीता आणि बौद्ध धर्माचे भाष्यकार होते. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान या गहन विषयांवर अनेक ग्रंथ लिहिणारे ते प्रकांड पंडित होते; पण बहुजन समाजाच्या लेखकाच्या वाट्याला येणारी फरफट केळूसकरांच्या वाट्याला आली. महाराष्ट्राच्या वाङ्मयमहर्षीची उपेक्षाच झाली.
जनात जनार्दन पाहणारे गुरुवर्य केळूसकर ऋषितुल्य प्रज्ञावंत होते. म. फुले यांची सत्यशोधक चळवळ आणि मराठा ऐक्येच्छू सभेसाठी आयुष्यभर काम केले.
त्यांच्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे नेते समाजास मिळाले. केळूसकरांची ही आत्मकथा आणि चरित्र पुरोगामी महाराष्ट्राने आज पुन्हा वाचण्याची गरज आहे.
Share
