Gumnam By Gaurihar (गुमनाम)
Gumnam By Gaurihar (गुमनाम)
Regular price
Rs. 297.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 297.00
Unit price
/
per
पावसाळ्याची एक शांत रात्र, पावसाची भुरभुरदेखील एवढी शांत होत आहे की, फक्त पथदिव्यांच्या प्रकाशझोतामध्ये काही थेंब तरंगताना दिसावेत. अशात अचानक प्रिन्स चार्ल्स रोड, कॅम्पमध्ये संपूर्ण वातावरणात दाट धुकं पसरतं. हे धुकं निर्माण झालं, ते मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेल्या लिक्विड नायट्रोजनमुळे. भासते ती फक्त एक धूसर आकृती शांतपणे चालत जाताना… एक परफेक्ट मर्डर… तोही निवृत्त आर्मी ऑफिसरचा! आणि त्याचा शोध घेण्यासाठी नियतीने निवडलेला, त्या प्रसंगात अडकलेला इन्स्पेक्टर श्रीनेश! पण… कुणी केला हा खून? एकाने की अनेकांनी? असे किती खून झालेत? एक की अनेक? खुनामागचं रहस्य काय? कशासाठी? अशा अनेक प्रश्नांच्या शोधात असलेल्या श्रीनेशचा प्रवास आणि ते रहस्य उलगडणारी कहाणी… ‘गुमनाम’