Skip to product information
1 of 1

Gulmohar By V.P.Kale (गुलमोहर)

Gulmohar By V.P.Kale (गुलमोहर)

Regular price Rs. 153.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 153.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

गुलमोहराचं झाड केव्हाही छान दिसतं. निळ्यानिळ्या आकाशाच्या पाश्र्वभूमीवर ते जेवढ्या डौलानं शेंडे वर करून डुलतं, तेवढ्याच श्रीमंतीनं काळ्याभोर पावसाळी ढगांवरसुद्धा वैभवशाली दिसतं, भव्य वाटतं. पण दिवाकरपंतांना गुलमोहराचं झाड आता बघवेना. तो त्यांचा पराभव होता. भंग पावलेलं स्वप्न होतं. लाकूडतोड्या झाडावर सरड्याप्रमाणे चढला. वरच्या फांदीवर पहिली कुहाड बसली आणि त्या पहिल्या घावानं दिवाकरपंतांच्या अख्ख्या भूतकाळातील आठवणींवर तडाखा हाणला. दुसया घावासरशी त्यांचा भविष्यकाळ नष्ट केला. तिसरा घाव बसला आणि दिवाकरपंतांना प्लॉटचा वर्षवाढदिवस आठवला. घावाघावागणिक आठवणींचा मोहर झोडपला जात होता. खाली पडणाया फांद्या चुकवीतचुकवीत दिवाकरपंत तांबडी फुलं भराभर वेचत होते. घावावर घाव बसत होते. झाडाची उंची कमी होत होती, दिवाकरपंतांचं स्वप्नही लहानलहान होत होतं.गुलमोहराचं झाड केव्हाही छान दिसतं. निळ्यानिळ्या आकाशाच्या पाश्र्वभूमीवर ते जेवढ्या डौलानं शेंडे वर करून डुलतं, तेवढ्याच श्रीमंतीनं काळ्याभोर पावसाळी ढगांवरसुद्धा वैभवशाली दिसतं, भव्य वाटतं. पण दिवाकरपंतांना गुलमोहराचं झाड आता बघवेना. तो त्यांचा पराभव होता. भंग पावलेलं स्वप्न होतं. लाकूडतोड्या झाडावर सरड्याप्रमाणे चढला.

View full details