Skip to product information
1 of 1

Gulamgiri By Mahatma Jyotiba Fule (गुलामगिरी - महात्मा ज्योतिबा फुले)

Gulamgiri By Mahatma Jyotiba Fule (गुलामगिरी - महात्मा ज्योतिबा फुले)

Regular price Rs. 70.00
Regular price Rs. 70.00 Sale price Rs. 70.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language version
Quantity

या ग्रंथाचा मुख्य उद्देश असा आहे की, आज शेकडो वर्षे शूद्रादि अतिभूद्र, ब्राह्मण लोकांचे राज्य झाल्यापासून सतत दुःखे सोशीत आहेत च नाना प्रकारच्या यातनेत आणि संकटांत दिवस काढीत आहेत, या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष्य लागून त्यांनी त्याविषयी नीट विचार करणे व येथून पुढे भटब्राह्मण लोकांचे अन्यायी जुलमापासून आपली सुटका कशी करून घेणे हाच काय तो आहे. या देशात भट लोकांचे राज्य होऊन सुमारे तीन हजार वर्षांपासून अधिक काळ लोटून गेला असावा, असे अनुमान होते. ते लोक परकीय देशांतून येऊन या देशांतील मूळचे राहणारे लोकांस जिंकून त्या सर्वांस त्यांनी आपले दास केले व त्यांस अनेक तन्हेची क्रूर शासने दिली. पुढे काही काळानंतर त्या लोकांस या गोष्टींचे विसर्जन झालेसे पाहून भट लोकांनी परकीय देशांतून बेऊन या देशांतील मूळचे लोकांस जिंकून त्यास दास केल्याचे मुळीचे छपवून ठेविले. या लोकांनी आपली बजनदारी ह्या लोकांचे मनावर बसवायची याजकरिता जेणेकरून आपले मात्र हित होईल असे नाना प्रकारचे उपाय योजले व ते सर्व सिद्धीस जात गेले; कारण त्या वेळेस ते लोक सत्तेच्या संबंधानें पूर्वी पराधीन झालेलेच होते व पुढे त्यास भट लोकांनी ज्ञानहीन करून टाकिले, यांजमुळे भट लोकांचे पांचपेंच त्यांचे लक्षांत मुळीच आले नाहीत. त्यांनी त्यांच्यावर सर्वस्व मिळवून त्यांस अक्षय आपले ताब्यात ठेवण्याकरिता केवळ स्वहितास अनुकूलसून पुष्कळ बनावट ग्रंथ करून ते आपण सर्वांस ईश्वरापासून प्राप्त झाले, असे त्या वेळचे अज्ञानी लोकांस सांगून त्यांचें मन सर्वस्वी वळविले. त्या ग्रंथांत त्यांनी असें लिहिलें कीं, शुद्रांस ईश्चराचा उत्पन्न करण्याचा हेतू इतकाच आहे की, त्यांनी सर्वसर्वदा भट लोकांच्या सेवेत तत्पर असावें व जेणेकरून त्यांची मर्जी खुष राहील असें करावें; म्हणजे ते ईश्वराला पावन होऊन त्यांचे देहांचे येण्याचे सार्थक झालें. आतां कोणी या ग्रंथांविषयी थोडासा विचार केला असतां ते कितपत खरे आहेत व ते ईश्चरापासून आले असावें किंवा कसें, हे लागलीच कळून येईल, अशा ग्रंथापासून सर्व शक्तिमान, सर्व जगाचा व त्यांतील सर्व वस्तूंचा उत्पन्नकर्ता जो परमेश्वर त्यांच्या समसृष्टीला मोठें गौणतव आणलें

View full details