Gin And Tonic By Dwarkanath Sanzgiri (जिन अँण्ड टॉनिक)
Gin And Tonic By Dwarkanath Sanzgiri (जिन अँण्ड टॉनिक)
Couldn't load pickup availability
'जिन आणि टॉनिक'हे माझं नवं पुस्तक. नाव वाचून दचकलात? हे पुस्तक कुठल्याही मद्याच्या विषयाशी निगडीत नाही. हे प्रवास वर्णन आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल असं नाव कसं? जिन आणि टॉनिक हे अतिशय सुंदर कॉकटेल आहे. 'जिन' म्हणजे अर्थातच मद्य आणि 'टॉनिक' म्हणजे इंडियन टॉनिक वॉटर. त्यामध्ये 'क्विनीन' असतं. एकेकाळी 'क्विनीन' हा मलेरियावरील जालीम उपाय होता. त्यावेळी गोरे साहेब भातातल्या मलेरियापासून वाचण्यासाठी इंडियन 'टॉनिक' वॉटरचा उपयोग करत असत. त्यातून हे पेय तयार झालं. माझ्या या पुस्तकामध्ये मी आयर्लंड आणि पाश्चात्य संस्कृतीबद्दल लिहिलेलं आहे. त्याचबरोबर राजस्थानमधल्या भारतीय संस्कृतीबद्दलसुद्धा. माझ्या पुस्तकातलं 'जिन' आहे 'आयर्लंड' आणि इतर पाश्चात्य संस्कृतीवरील लेख आणि 'इंडियन टॉनिक वॉटर' आहे राजस्थान, श्रीलंका, बँकॉक वगैरे आशियाई देशावरचे लेख. लेखांचं हे कॉकटेल तुम्हाला 'जिन आणि टॉनिक' एवढं नशिलं वाटेल ह्याची मला खात्री आहे.
Share
