Ghani Bhag 2 By Kavita Pachangre - Kharat
Ghani Bhag 2 By Kavita Pachangre - Kharat
Couldn't load pickup availability
लेखिका कविता पाचचे यांच्या घाणी आणि स्मशान या दोन्ही कादंबऱ्या वाचताना। एखाद्याच्या अश्राप जीवनात इतकं विदारक दुःख असू शकतं याचा प्रत्यय पदोपदी येत होता. घाणी या कादंबरीत 'पुढे काय घडले असेल?' या प्रश्नानं मनात थैमान घातलं होतं. आणि साहजिकच घाणी भाग-दोन वाचताना नायिका असलेल्या घाणीबद्दल एक सहानुभूती होती जी दारिद्र्याने पिचलेल्या वाड्या-पाड्यावरील बालजीवनाचे प्रतिनिधित्व करीत होती. या बालनायिकेच्या दुखऱ्या आयुष्याला नाट्यमय वळण देऊन वाचकांना सुखद धक्का देत कादंबरीचा झालेला शेवट तृप्त करून जातो.
पाड्यावरील बोलीभाषेतील संवाद वाचताना घटनेचे प्रत्यक्ष चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. या बोलीतील शब्दांचा छोटेखानी कोश कादंबरीच्या शेवटी देऊन लेखिकेनं वाचकास सुलभ आकलनाचा प्रत्यय दिला आहे. दगडालाही पाझर फोडणारा घाणीचा स्वभाव आणि मानवी संस्कृतीला उच्च पातळीवर नेऊन ठेवणारे तिथे विचार अंतर्मुख व्हायला लावतात. सत्काकार्याचे फलित म्हणून मिळालेली स्वतःच्या सुटकेची संधी नाकारून धाजीने गुलामीत सडत असलेल्या बापासह सर्व लोकांची केलेली मुक्तता आदर्श मानवी जीवनाचा परमोच्चबिंदू आहे. प्रेमाने जगही जिंकचा येते या सुवचनाचा परिपाश सिध्या वर्तनाने सिद्ध केला आहे, तर सुडाचा लवलेशही मनात न ठेवता घाणीने खलनायकाला उदार अंतकरणाने दिलेले जीपदान औदायांची परिसीमा गाठते.
Share

